शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशात 'व्होट जिहाद' चालणार की 'राम राज्य'? आपल्याला ठरवायचे आहे"; PM मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
2
धक्कादायक! धाराशिव जिल्ह्यात मतदान केंद्राबाहेर तरुणांचा राडा, वादातून एकाचा खून
3
मनात धाकधूक की राजकीय खेळी? सुप्रियाताई अचानक अजितदादांच्या घरी का गेल्या?; बारामतीत तर्कवितर्क
4
अरविंद केजरीवाल यांना दुहेरी धक्का; सुप्रीम कोर्टाचा दिलासा नाही, कोठडी २० मेपर्यंत वाढवली
5
उमेदवारी न मिळालेले शिंदें गटातील खासदार राजेंद्र गावित भाजपात, देवेंद्र फडणवीस म्हणाले...
6
किरण सामंत नॉट रिचेबल, ठाकरे गटाने केली पोलीस संरक्षण देण्याची मागणी, उदय सामंतांनी दिलं असं स्पष्टीकरण
7
Closing Bell: सेन्सेक्स-निफ्टी पुन्हा घरसला, ३ दिवसांत गुंतवणूकदारांचे ११ लाख कोटी बुडाले
8
'हीरामंडी'मधील शेखर सुमनसोबतच्या इंटीमेट सीनवर मनीषा कोईरालानं सोडलं मौन, म्हणाली...
9
गुजरातमधील नवसारी मतदारसंघात मराठीचाच 'आवाssज', मताधिक्य पाहून व्हाल अवाक्
10
दृष्टीहीन तरुणीने पंतप्रधानांचा हात पकडला; SPG कमांडो आला तेवढ्यात...पाहा मोदींनी काय केले
11
Baramati Lok Sabha : 'मटण, दारु, मताला हजार रुपये वाटले...' सुनिल शेळकेंचे आमदार रोहित पवारांवर गंभीर आरोप
12
₹१४४ वर आलेला IPO; आता शेअरनं पकडल रॉकेट स्पीड, ४ दिवसांपासून लागतंय अपर सर्किट
13
उत्तर प्रदेशमध्ये इंडिया आघाडीसाठी राहुल गांधींनी घेतला मोठा निर्णय; भाजपाच्या अडचणी वाढणार?
14
MS Dhoni च्या फलंदाजी क्रमावरून टीका करणाऱ्यांनो, जरा कारण जाणून घ्या! औषधं खाऊन खेळतोय तो
15
भाजपात सामील झाल्यानंतर शेखर सुमन म्हणाले, "मी सामान्य माणूस, हिरामंडीचा नवाब नाही..."
16
"मी नाही तर कोण?" अमिताभ बच्चन यांच्याशी तुलना केल्यानंतर ट्रोल झालेली कंगना पुन्हा बरळली
17
लखनौ-गुवाहाटी-वाराणसी! KKR चं विमानाची दोन वेळा दिशा बदलली, खेळाडूंनी घेतलं काशी दर्शन अन् 
18
Gold Silver Price: अक्षय्य तृतीयेपूर्वी घसरले सोन्याचे दर; आज 'इतकं' स्वस्त झालं १० ग्राम Gold 
19
गुड न्यूज! कोरोना व्हायरसच्या प्रत्येक व्हेरिएंटवर प्रभावी ऑल-इन-वन लस बनवताहेत शास्त्रज्ञ
20
दीपिका पदुकोण रणवीर सिंहसोबत एन्जॉय करतेय Babymoon, पहिल्यांदाच दिसला बेबीबंप

खो-खोमध्ये शीतलची ‘राष्ट्रीय’ भरारी , परदेशात झेंडा रोवण्यासाठी करतेय कठोर परिश्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2017 4:16 AM

इयत्ता सहावीपासून तिने खो-खो खेळायला सुरुवात केली आणि अल्पायुतच राष्ट्रीय पदकावर आपले नाव कोरले. उत्कृष्ट खो-खोपटू बरोबरच ती उत्कृष्ट धावपटू आहे.

- प्राची सोनवणे।

नवी मुंबई : इयत्ता सहावीपासून तिने खो-खो खेळायला सुरुवात केली आणि अल्पायुतच राष्ट्रीय पदकावर आपले नाव कोरले. उत्कृष्ट खो-खोपटू बरोबरच ती उत्कृष्ट धावपटू आहे. राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाचे नाव कोरणारी शीतल भोर नवी मुंबईतील कोपरखैरणेत राहते. खो-खोसारख्या खेळाला आता आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता मिळाली आहे. त्यामुळे परदेशात झेंडा रोवण्यासाठी शीतल सध्या कठोर परिश्रम घेत आहे.सध्या शीतल पदवीचे शिक्षण घेत असून, यापुढे ती खो-खो या खेळातच यशस्वी करिअर करणार आहे. प्रशिक्षक सुधीर थळे यांच्या मार्गदर्शनाखाली ती पहिल्यांदा स्पर्धेत सहभागी झाली. सध्या प्रशिक्षक मयूर पालांडे यांच्या मार्गदर्शनाखाली ती प्रशिक्षण घेत आहे. दररोज सकाळी दोन तास आणि संध्याकाळी दोन तास ती कसून सराव करते. केरळ राज्यात झालेल्या ३५व्या राष्ट्रीय स्पर्धेत शीतलने सुवर्ण पदक पटकविले आहे. गुवाहाटी येथे झालेल्या दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धेतही उत्कृष्ट कामगिरी बजावत सुवर्ण पदकाची मानकरी ठरली. ११ राज्यस्तरीय स्पर्धा आणि ६ राष्ट्रीय स्पर्धेत शीतल सहभागी झाली असून, एक उत्कृष्ट खो-खोपटू म्हणून तिने स्वत:ची ओळख निर्माण केली आहे. जिल्हास्तरीय मॅरेथॉन स्पर्धेतही ती यशस्वी ठरली आहे. २०१५-१६ दरम्यान पुणे येथे झालेल्या राज्यस्तरीय खो-खो स्पर्धेत शीतलने बेस्ट खेळाडूचा किताब पटविला. ग्रिफीन जिमखाना येथे ती सराव करत असून, जिमखाना तसेच मार्गदर्शिका गंधाली पालांडे यांचे सर्वतोपरी सहकार्य लाभल्याची प्रतिक्रिया शीतलने व्यक्त केली.नाशिक येथे झालेल्या राज्य अजिंक्यपद आणि निवड चाचणीत ठाणे जिल्हा संघातून खेळताना शीतलने अष्टपैलू किताब पटविला तर ठाणे येथे झालेल्या राज्य अजिंक्य स्पर्धेत तिचा संघ विजयी ठरला. खो-खो स्पर्धेत संरक्षक म्हणून उभे राहण्याची शीतल भोर हिची सर्वाधिक वेळ ३.४० मिनिटे इतकी आहे. नंदूरबार, नांदेड, अहमदाबाद, नाशिक, उस्मानाबाद, रोहा, ठाणे, सातारा येथे झालेल्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत तिने यश मिळविले आहे.खो-खो खेळाला आता जागतिक स्तरावरही महत्त्व प्राप्त होत असून, आणखी खेळाडू तयार होणे गरजेचे आहे, असेही शीतलने सांगितले. कुटुंबीय, प्रशिक्षक आणि मार्गदर्शकांनी वेळोवेळी केलेल्या सहकार्यामुळे आजवर भरघोस यश मिळाल्याचे तिने सांगितले.खेळाबरोबरच अभ्यासातही हुशाररोजचा सराव, विविध स्पर्धांची तयारी या साºयांमध्ये वेळात वेळ काढून अभ्यास बुडणार नाही याचीही काळजी घेते. अभ्यास आणि खेळ या दोघांची सांगड घालत खेळामुळे शैक्षणिक नुकसान होणार नाही याची पुरेपूर काळजी घेतली जाते. शीतलने दहावी बोर्डाच्या परीक्षेत ९१ टक्के तर बारावी बोर्डाच्या परीक्षेत ८१ टक्के मिळविले.