शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
2
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
3
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
4
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
5
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
6
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
7
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
8
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
9
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
10
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
11
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
12
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
13
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
14
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
15
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
16
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
17
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
18
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
19
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
20
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव

लोकमत सखी मंच आयोजित श्रावण सोहळ्यात सखींची धमाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2018 05:29 IST

‘स्टार प्रवाह’च्या सहकार्याने आयोजन : ‘विठूमाऊली’मधल्या रुक्मिणीने जिंकली मने

नवी मुंबई : सणवार, व्रतवैकल्ये, पूजाअर्चा आणि निसर्गाचे बहरलेले सौंदर्य यांचे एकत्रीकरण म्हणजे श्रावण होय. या श्रावणाचा आनंद सखींना आपल्या मैत्रिणींसोबत उपभोगता यावा म्हणून लोकमत सखी मंचच्या वतीने शनिवारी सायंकाळी शिवविष्णू मंदिर सभागृह, वाशी येथे ‘श्रावण सोहळा’ या बहारदार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मनोरंजन आणि परंपरा यांचा सुरेख मेळ साधणाऱ्या या कार्यक्रमाचा सखींनी मनोमन आनंद लुटला.

गर्द हिरवी साडी आणि महाराष्ट्रीयन नथ, पाना- फुलांचा कल्पकतेने वापर करून तयार केलेल्या आभूषणांनी नटलेल्या सखी, मजेदार उखाणे, संस्कृतीचा वसा पुढील पिढीला समजावून सांगणारे मंगळागौरीचे खेळ, श्रावणाचे विविध रंग रेखाटलेले बहारदार नृत्य, स्टार प्रवाहच्या रुक्मिणी सोबतच्या गप्पा- टप्पा आणि बक्षिसांची लयलूट अशा स्वरूपाचा हा कार्यक्रम सखींवर आनंदाची उधळण करणारा ठरला. स्टार प्रवाहच्या ‘विठूमाऊली’ या मालिकेतील रुक्मिणी यांची याप्रसंगी प्रमुख उपस्थिती होती. स्टार प्रवाह हे या सोहळ्याचे सहप्रस्तुतकर्ता होते.स्टार प्रवाहची महाराणी, विनोदी उखाणा यासारख्या स्पर्धा यावेळी उत्साहात पार पडल्या. भाग्यश्री आर्यमाने यांनी या स्पर्धांसाठी परीक्षक म्हणून काम पाहिले. क्वीन आॅफ सखी मंच, सीवूड्सतर्फे सादर करण्यात आलेल्या पारंपरिक मंगळागौरीच्या खेळांनी कार्यक्रमात रंगत आणली.या वेळी उखाणा स्पर्धेचे आयोजनही करण्यात आले होते. यात मृणालिनी वानखडे, डॉ.प्रगती जगताप, सायली ठगवेकर यांना अनुक्रमे प्रथम, द्वितीय, तृतीय तर यामिनी भारसे, हेमा दळवी यांनी उत्तेजनार्थ अशी पारितोषिके पटकावली. कुणाल रेगे यांनी उत्कृष्ट संचालन केले.स्टार प्रवाहची महाराणी : स्टार प्रवाहची महाराणी ही अनोखी स्पर्धा घेण्यात आली. नृत्य, फॅशन शोच्या माध्यमातून स्वत:चा परिचय, उखाणा आणि परीक्षकांची फेरी या तीन फेºयांमध्ये ही स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेचे परीक्षण स्वत: स्टार प्रवाहच्या ‘विठूमाऊली’या मालिकेतील रुक्मिणी यांनी केले. प्रत्येक फेरीत उत्तम कामगिरी करणाºया आरती राऊळ या ‘स्टार प्रवाहची महाराणी’ ठरल्या. वैशाली मुके, हेमा दळवी, जुतिका भोसले यांना उत्तेजनार्थ पारितोषिक मिळाले.स्टार प्रवाहच्या ‘विठूमाऊली’ या मालिकेतील रुक्मिणी यांनी सखींशी मनमोकळा संवाद साधून या धकाधकीच्या जीवनात ज्या उत्साहाने सर्वजणी स्पर्धामध्ये सहभागी होतात त्याबद्दल सखींचे विशेष कौतुक केले.सखींनी त्यांच्यासोबत सेल्फी काढत या अविस्मरणीय सोहळ्याच्या आठवणी कॅमेºयात कैद केल्या आणि श्रावण सोहळ्याचा धमाल आनंद लुटला. सेटवरच्या गमतीजमती आणि स्वत:च्या जीवनातील काही रंजक प्रसंग सांगून त्यांनी महिलांना स्वत्व, आत्मसन्मान जपण्याचा संदेश दिला.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईLokmatलोकमत