शिवडी-न्हावाशेवा सी-लिंकला प्रकल्पग्रस्तांचा खोडा!

By Admin | Updated: November 23, 2014 00:55 IST2014-11-23T00:55:15+5:302014-11-23T00:55:15+5:30

कोकणच्या विकासाचे नवे पर्व ठरणा:या न्हावाशेवा-शिवडी सी-लिंकच्या जमीन संपादनासाठीचा सव्र्हे करण्यास जासईच्या शेतक:यांनी विरोध केला आहे.

Sewri-Nhava Sheva C-Link to Digest Project Corruption! | शिवडी-न्हावाशेवा सी-लिंकला प्रकल्पग्रस्तांचा खोडा!

शिवडी-न्हावाशेवा सी-लिंकला प्रकल्पग्रस्तांचा खोडा!

उरण : कोकणच्या विकासाचे नवे पर्व ठरणा:या न्हावाशेवा-शिवडी सी-लिंकच्या जमीन संपादनासाठीचा सव्र्हे करण्यास जासईच्या शेतक:यांनी विरोध केला आहे. राष्ट्रीय महामार्ग 54 साठी संपादित केलेल्या जमिनींचा मोबदला तसेच 3क् वर्षापूर्वी सिडकोने दिलेल्या आश्वासनांची पूर्तता केल्याशिवाय या ठिकाणी सी-लिंकसाठी सव्र्हे करू देणार नाही, असा इशारा प्रकल्पग्रस्तांनी सिडकोला दिला आहे. दरम्यान, प्रकल्पासाठी जमीन सव्र्हेची अंतिम मुदत 2क् डिसेंबरला संपत असल्याने हा प्रकल्प धोक्यात आला आहे.
न्हावा-शिवडी या 22.5 किलोमीटरच्या सागरी महामार्गासाठी चिर्ले, जासई, गव्हाणमधील 494 खातेदारांची 27.99 हेक्टर जमीन संपादित केली जाणार आहे. यामध्ये चिर्ले येथील 191 खातेदारांची 4.35 हेक्टर, जासई येथील 283 खातेदारांची 15.क्9 हेक्टर, गव्हाण येथील 23 खातेदारांची 7.66 हेक्टर जमीन संपादन होणार आहे. त्या अनुषंगाने सिडकोच्या अधिका:यांकडून न्हावा - शिवडी सागरी सेतू प्रकल्पग्रस्त संघटनेच्या पदाधिका:यांना बैठकीला बोलावून प्रकल्पासाठी जमिनींची मोजणी करण्यास अडथळा आणू नयेत, यासाठी समजूत काढली जात आहे.
जमिनींचा सव्र्हे लवकरात लवकर व्हावा यासाठी नुकताच सिडको अधिकारी आणि प्रकल्पग्रस्त शेतकरी यांच्यात बैठक झाली. यावेळी सिडकोचे प्रमुख संजय भाटिया आणि एमएमआरडीएचे अधिकारी तसेच प्रकल्पग्रस्तांच्या समितीचे पदाधिकारी उपस्थित होते. सिडकोने संपादित झालेल्या जमिनींचा मोबदला, लोकनेते दि. बा. पाटील यांचे स्मारक आणि  प्रकल्पग्रस्तांच्या 3क् वष्रे प्रलंबित प्रश्नांवर आधी योग्य तो तोडगा आधी काढा नंतरच सव्र्हेला नाहरकत दिली जाईल, असा पवित्र शेतक:यांनी घेतला. यावेळी  समितीचे सल्लागार महेंद्र घरत आणि अध्यक्ष सुरेश पाटील यांनी प्रकल्पग्रस्तांचे 3क् वर्षापासून प्रलंबित असलेले प्रश्न आधी सोडवा अन्यथा सव्र्हेला येणा:या अधिका:यांना सळो की पळो करू, असा इशारा या बैठकीत व्यवस्थापनाला दिला.  (वार्ताहर)
 
बैठकांचा फार्स : विशेष म्हणजे सिडकोने या सागरी सेतूसाठी जमीन संपादनाबाबत यापूर्वी अनेकदा बैठका घेतल्या. यामध्ये अनेक निर्णय घेण्यात आले. मात्र त्यापैकी एकाही निर्णयाची पूर्तता सिडकोने केली नाही. त्याचप्रमाणो 3क् वर्षापासून प्रलंबित असलेल्या अनेक प्रश्नांवर सिडकोच्या अधिका:यांनी ठोस निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे प्रकल्पग्रस्तांमध्ये सिडकोविरोधात संतापाची लाट आहे.
 
काय आहेत मागण्या
‘राष्ट्रीय महामार्ग 54’साठी दिलेल्या जमिनींचा मोबदला, लोकनेत दि. बा. पाटील यांचे स्मारक, घरटी एक नोकरी, प्रकल्पग्रस्तांचे 1क्क् टक्के पुनर्वसन, बारा बलुतेदारांसाठी भूखंड वाटप, जासई गावासाठी क्रीडांगण

 

Web Title: Sewri-Nhava Sheva C-Link to Digest Project Corruption!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.