पनवेल मधील पारगाव, दापोलीत भीषण टंचाई 

By वैभव गायकर | Updated: April 5, 2023 17:40 IST2023-04-05T17:39:46+5:302023-04-05T17:40:20+5:30

पनवेल मधील दापोली ,पारगाव ,ओवळे ,कुंडेवहाल ग्रामपंचायत हद्दीततील नागरिकांना सध्याच्या घडीला भीषण पाणी टंचाईला तोंड द्यावे लागत आहे.

Severe shortage in Pargaon Dapoli in Panvel | पनवेल मधील पारगाव, दापोलीत भीषण टंचाई 

पनवेल मधील पारगाव, दापोलीत भीषण टंचाई 

पनवेल:

पनवेल मधील दापोली ,पारगाव ,ओवळे ,कुंडेवहाल ग्रामपंचायत हद्दीततील नागरिकांना सध्याच्या घडीला भीषण पाणी टंचाईला तोंड द्यावे लागत आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या ढिसाळ कारभाराचा फटका येथील ग्रामस्थांना बसला असुन येथील ग्रामस्थांना विकतचे पाणी प्यावे लागत आहे.

नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळ गाभा क्षेत्रात हि सर्व गावे येत असुन एमजेपीचे नियोजन याठिकाणी कोलमडल्याने हि समस्या उद्भवली आहे.पनवेल ते दापोली परिसरातील एमजेपीची जलवाहीनी जीर्ण झाली असल्याने अनेक ठिकाणी या जलवाहिनीला गळती लागली आहे.याबाबत दापोली ग्रामपंचायतीचे माजी उपससरपंच आणि विद्यमान सदस्य समाधान घोपरकर यांनी एमजेपी प्रशासनाच्या ढिसाळ कारभारामुळे हि समस्या उद्भवली असल्याचा आरोप केला.याबाबत एमजेपीने समस्या मार्गी न लावल्यास एमजेपी कार्यालयावर ग्रामस्थांना घेऊन मोर्चा काढण्याचा ईशारा घोपरकर यांनी दिला आहे.

Web Title: Severe shortage in Pargaon Dapoli in Panvel

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.