अल्पवयीन मुलींच्या छेडछाड प्रकरणी सात तरूणांना अटक
By Admin | Updated: September 25, 2015 02:25 IST2015-09-25T02:25:34+5:302015-09-25T02:25:34+5:30
कर्जत तालुक्यातील बलिवरे गावातील माध्यमिक शाळेत शिक्षण घेण्यासाठी जाणाऱ्या मुलींची गेली अनेक महिने ऐनाचीवाडीमधील सहा तरु ण छेड काढत होते.

अल्पवयीन मुलींच्या छेडछाड प्रकरणी सात तरूणांना अटक
नेरळ : कर्जत तालुक्यातील बलिवरे गावातील माध्यमिक शाळेत शिक्षण घेण्यासाठी जाणाऱ्या मुलींची गेली अनेक महिने ऐनाचीवाडीमधील सहा तरु ण छेड काढत होते. त्याप्रकरणी सहा तरु ण आणि त्यांना मदत करणारा शिक्षक यांच्यावर नेरळ पोलीस स्टेशनमध्ये पोस्कोअंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.
कर्जत तालुक्यातील झुगरेवाडी-म्हसा रस्त्यावर भीमाद्री माध्यमिक शाळा आहे. त्या परिसरातील गावांमधील विद्यार्थी त्या शाळेत शिक्षण घेतात, त्यासाठी पायी चालत जात असतात. बलिवरे गावातील विद्यार्थी देखील मोठ्या संख्येने भीमाद्री विद्यालयात जात असतात. साधारण १४-१५ वयोगटातील सात विद्यार्थिनी बलिवरे गावातून दीड किलोमीटर एकत्र चालत शाळेत जात असतात. त्यांना ऐनाचीवाडीमधील काही मुले अश्लील हावभाव करून त्रास देत होती. मागील शैक्षणिक वर्षापासून हा प्रकार सुरु होता. मात्र मागील दोन अडीच महिने बलिवरे गावातील विद्यार्थिनींना ते तरु ण आणखी त्रास देत होते. या मुली ज्या भीमाद्री विद्यालयात शिकत होत्या, त्या ठिकाणी ऐनाचीवाडीमधील रहिवाशी असलेले पादिर हे विद्यालयात शिक्षक आहेत. त्यामुळे बलिवरे गावातील त्या सर्व मुली अश्लील हावभाव करणाऱ्या ऐनाच्यावाडीमधील तरु णांची तक्र ार करायच्या. मात्र एकदाही या शिक्षकाने याची दखल घेतली नाही.