शहरं
Join us  
Trending Stories
1
"तेच रडणे, तीच मळमळ, त्याच उलट्या, त्याच फुशारक्या...", भाजपाने उद्धव ठाकरेंना डिवचलं
2
तेव्हा गरजेपेक्षा जास्त कर्मचारी भरले, आता त्यांना बेरोजगार करणार; ॲमेझॉनमध्ये ३०,००० नोकऱ्या धोक्यात
3
"महाराष्ट्रात भाजप कोणाच्याही कुबड्यांवर चालत नाही; सत्तेमुळे तुम्ही समाधानी असाल, पण मी नाही": शाह
4
आजचे राशीभविष्य, २८ ऑक्टोबर २०२५: ‘मौनं सर्वार्थ साधनम्’, येणी वसूल होतील; सरकारी लाभ
5
चिनी हँडलर, टेलिग्राम ट्रॅप, लाखोंची लूट... ४७ लाखांच्या फसवणुकीचा पर्दाफाश, तिघांना अटक
6
तुमचे अधिकारी वृत्तपत्र वाचत नाहीत का? देशाची प्रतिमा मलिन होतेय; भटक्या कुत्र्यांवरून भडकले कोर्ट
7
१२ राज्यांमध्ये होणार मतदार याद्यांची पडताळणी; SIR दुसरा टप्पा ४ नोव्हेंबरपासून, महाराष्ट्राचा समावेश नाही
8
मतदाराचे आणि त्याच्या वडिलाचे आडनाव वेगवेगळे, २० हजार मतदारांची नावे संशयास्पद: आदित्य ठाकरे
9
शाळेची नव्हे, धोक्याची घंटा! सरकारी अनास्था आणि 'विनाअनुदानित' इंग्रजी शाळांचा वाढता बाजार
10
सरन्यायाधीश बूटफेक प्रकरण: वकिलावर कारवाई करणार नाही; सर्वोच्च न्यायालयाचे स्पष्टीकरण
11
तातडीने सुनावणीस नकार, पण दोन मागण्या मान्य; मराठा-ओबीसी आरक्षण वादात ओबीसी संघटनेला कोर्टाचा दिलासा
12
'चुका दुरुस्त केल्याशिवाय निवडणुका घेता येणार नाही'; उद्धव ठाकरेंची निवडणूक आयोगावर टीका
13
तोटा झाल्याची बनावट कागदपत्रे; कुर्ल्यातील कंपनीने कॅनरा बँकेला तब्बल ११ कोटींना गंडवले
14
शिवडीतील दागिने लुटीचा सुरक्षारक्षक निघाला सूत्रधार; एकाच घरात राहत होते सर्व आरोपी
15
राम जन्मभूमी मंदिराचे काम पूर्ण, २५ नोव्हेंबरला भव्य सोहळा, ६ ते ८ हजार निमंत्रित येणार
16
जामीन अर्जाविरोधात अर्ज करण्याचा प्रश्नच येत नाही; खालिद, शार्जिलवरून कोर्टाने दिल्ली पोलिसांना फटकारले
17
विद्यार्थिनीने स्वतः टॉयलेट अ‍ॅसिड आणले, वडिलांनीच कट रचला; डीयू विद्यार्थिनी अ‍ॅसिड हल्ला प्रकरणात मोठा ट्विस्ट
18
बांगलादेशात हाफीज सईदची नापाक खेळी; ईशान्येकडे भारतासाठी धोक्याची घंटा, सीमेवर हालचाली वाढल्या
19
रेस्टॉरंटमध्ये भाऊ-बहिणीशी पोलिसांचे गैरवर्तन; व्हिडीओ व्हायरल, एसओने कारणे दाखवा नोटीस बजावली
20
छठ पूजेदरम्यान उत्तर प्रदेशात मोठी दुर्घटना; लोक सेल्फी घेत असतानाच नाव उलटली, अनेक जण बुडाल्याची शक्यता

CoronaVirus News : खारघर शहरातील नागरी वस्तीत कैद्यांचे विलगीकरण केंद्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2020 00:25 IST

खारघरमधील गोखले शाळेत केलेल्या विलगीकरण केंद्रात तळोजा कारागृहातील सुमारे २०० पेक्षा जास्त कैदी ठेवण्यात आल्याने, परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

पनवेल: खारघरमधील गोखले शाळेत केलेल्या विलगीकरण केंद्रात तळोजा कारागृहातील सुमारे २०० पेक्षा जास्त कैदी ठेवण्यात आल्याने, परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. आर्थर रोड कारागृहात झालेल्या कोरोनाच्या शिरकावाच्या दृष्टीने कारागृह प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. मात्र, रहदारीच्या व दाट लोकवस्तीच्या ठिकाणी कैद्यांना ठेवण्यात आल्याने, मनसेने आक्रमक भूमिका घेत या विलगीकरण केंद्राला इतरत्र हलविण्याची मागणी केली आहे.खारघर येथील तळोजा मध्यवर्ती कारागृहात कैद्यांची क्षमता २,१२४ असून, सध्या कारागृहात दोन हजारांहून अधिक कैदी शिक्षा भोगत आहेत. एप्रिल महिन्यात मुंबईतील आर्थर रोड कारागृहात काही कैद्यांना कोरोनाची लागण झाल्यामुळे तळोजा मध्यवर्ती कारागृह प्रशासनाने सावध भूमिका घेत, नव्याने येणाऱ्या कैद्यांसाठी खारघरमधील गोखले शाळेत विलगीकरण केंद्राची निर्मिती केली. सुरुवातीला केवळ २० कैदी होते. त्यात मोठ्या प्रमाणात भर पडली असून, सध्या २०० हून अधिक कैद्यांना ठेवण्यात आले आहे. कारागृह पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, २०० कैद्यांच्या सुरक्षेसाठी केवळ ११ पोलीस तैनात करण्यात आले आहेत. त्यात दिवसा पाच, तर रात्रपाळीसाठी सहा पोलिसांची नेमणूक करण्यात आल्याचे समजले, तसेच शाळेच्या प्रवेशद्वाराबाहेर नवी मुंबई पोलीस मुख्यालयाचे चार पोलीस तैनात करण्यात आले आहेत. शाळेच्या सर्व खोल्या कैद्यांनी भरल्या आहेत. खारघर शहरातील गोखले शाळा हे ठिकाण सेक्टर १२ मधील रहदारीच्या व दाट लोकवस्तीचे असल्याने या ठिकाणी नागरिकांची मोठी लोकवस्ती असल्याने येथील रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. या कैद्यांना इतरत्र हलविण्याची मागणी पालिका आयुक्त सुधाकर देशमुख यांच्याकडे मनसेने शुक्रवारी निवेदनाद्वारे केली.कारागृह प्रशासनामार्फत कैद्यांना खारघर शहरातील गोखले शाळेत विलगीकरण केंद्रात ठेवण्यात आले आहे. पालिका प्रशासनाचे यामध्ये कोणतेही हस्तक्षेप नसल्याचे पालिका आयुक्त सुधाकर देशमुख यांनी सांगितले.>खारघर शहरात शहराच्या अवतीभोवती कैद्यांना ठेवण्यासाठी अन्य पर्याय उपलब्ध असताना अशाप्रकारे शहराच्या मध्यभागी दाट लोकवस्तीत कैद्यांचे विलगीकरण केंद्र स्थापन करणे चुकीचे आहे. या ठिकाणी अनुचित प्रकार घडण्याची शक्यता असल्याने याचा त्रास येथील रहिवाशांना सहन करावा लागू शकतो. याकरिता हे विलगीकरण केंद्राचे इतरत्र स्थलांतर करावे, अशी मागणी आम्ही आयुक्तांकडे केली आहे.- प्रसाद परब (मनसे, खारघर शहर अध्यक्ष)

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस