सिंधुदुर्गात सुरक्षा जवान आणि नागरिकांमध्ये हाणामारी
By Admin | Updated: October 17, 2014 02:03 IST2014-10-17T02:03:38+5:302014-10-17T02:03:38+5:30
विधानसभा निवडणुकीसाठी बंदोबस्तावर आलेले चेन्नईतील रेल्वे सुरक्षा विशेष दलाचे दोन जवान आणि काही व्यक्तींमध्ये एका पानाच्या स्टॉलवर भांडण झाले.

सिंधुदुर्गात सुरक्षा जवान आणि नागरिकांमध्ये हाणामारी
कुडाळ : विधानसभा निवडणुकीसाठी बंदोबस्तावर आलेले चेन्नईतील रेल्वे सुरक्षा विशेष दलाचे दोन जवान आणि काही व्यक्तींमध्ये एका पानाच्या स्टॉलवर भांडण झाले. नंतर त्याचे पर्यवसान हाणामारीत झाले. याप्रकरणी पोलीस ठाण्यात परस्परविरोधात गुन्हे नोंदविण्यात आले आहेत.
सुरक्षा दलाचे दोन जवान गुरुवारी सकाळच्या सुमारास केसीएन पान स्टॉलवर आले असता, किरकोळ कारणावरून त्यांचे आणि पान स्टॉलवरील ग्राहकांचे भांडण सुरू झाले. नंतर दोन्ही गटांत हाणामारी झाली. त्या जवानांनी पान स्टॉलधारक एजाज नाझी शेख (19) याच्यासह त्यांना सोडविण्यासाठी आलेल्या रामदास शिरसाट, आनंद शिरसाट व हरिश्चंद्र परब या दुकानदारांनाही मारहाण केली व दुकानाची तोडफोड केली, अशी तक्रार एजाजने पोलिसांत दिली. तर आपण केसीएन पान स्टॉलच्यासमोर हरीश नावाच्या मित्रसोबत उभे असताना तेथे बसलेल्या एका व्यक्तीने मित्रच्या तोंडावर थंडपेय टाकले व त्यानंतर आम्हाला मारहाण करण्यात आली, अशी तक्रार रेल्वे सुरक्षा विशेष दलाचा जवान सुनीलकुमार राजबीर सिंह (25) याने पोलिसांकडे केली. या
दोन्ही तक्रारीनुसार सात अज्ञातांवर कुडाळ पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत. (प्रतिनिधी)
नारायण राणो व वैभव नाईक दाखल
घटनेची माहिती मिळताच माजी पालकमंत्री नारायण राणो व शिवसेना जिल्हाप्रमुख वैभव नाईक कुडाळ पोलीस ठाण्यात आले व त्यांनी या घटनेची माहिती करून घेतली. यावेळी पोलीस ठाण्यात पोलीस अधिका:यांशी चर्चा करताना कुडाळमधील विविध पक्षांच्या पदाधिका:यांनी त्या सर्वाविरोधात दुकानात घुसून मारहाण, तोडफोड केली, असे गुन्हे त्या 15 ते 16 जवानांवर दाखल करा, नाहीतर आम्ही येथून हलणार नाही, असा पवित्र त्यांनी घेतला. संतप्त झालेल्या जनतेने शांत राहावे. या घटनेतील चुका केलेल्या व्यक्तींवर योग्य ती कारवाई करण्यात येईल, असे आवाहन राणो व नाईक यांनी केले.