भंगार चोरांचा धुमाकू ळ

By Admin | Updated: March 5, 2016 02:00 IST2016-03-05T02:00:37+5:302016-03-05T02:00:37+5:30

खालापूर तालुक्यातील साजगाव-आडोशी विभागात भंगारचोरांनी धुमाकूळ घातला आहे. अंधाराचा फायदा घेत हे भंगारचोर चोरी करण्यासाठी रात्रभर या परिसरात फिरत असल्याने स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण

Scrape the thieves! | भंगार चोरांचा धुमाकू ळ

भंगार चोरांचा धुमाकू ळ

खोपोली : खालापूर तालुक्यातील साजगाव-आडोशी विभागात भंगारचोरांनी धुमाकूळ घातला आहे. अंधाराचा फायदा घेत हे भंगारचोर चोरी करण्यासाठी रात्रभर या परिसरात फिरत असल्याने स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण असून पोलिसांचेही याकडे दुर्लक्ष होत असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. या भंगारचोरांना स्थानिक भंगार व्यावसायिकांचे सहकार्य मिळत असल्याने या भागातील बंद कारखान्यांना लक्ष केले जात असून यामुळे चोरीचे प्रमाण वाढले आहे. बंद कारखान्यांमध्ये काही स्थानिकांची मदत घेत ट्रक लावून भंगार चोरण्याचे काम सुरू असल्याचेही पहायला मिळत आहे.
खालापूर तालुक्यातील साजगाव-आडोशी विभाग हा मोठी औद्योगिक वसाहत म्हणून ओळखला जातो. या विभागात २०० हून अधिक लहान-मोठे कारखाने आहेत. यामध्ये स्टील आणि प्लास्टिकचे उत्पादन करणाऱ्या कारखान्यांची संख्या अधिक आहे. उत्पादन घेताना मोठ्या प्रमाणावर या कारखान्यामध्ये भंगार जमा होत असतो. दिवसभर हे भंगार चोर रस्त्याच्या शेजारी फिरून कचऱ्यातील भंगार गोळा करीत असताना परिसरात कुठे भंगार चोरता येईल याची पाहणी करतात आणि संधी साधून रात्री कंपनीमध्ये घुसून भंगार लंपास केले जाते. भंगार चोरांकडून अनेकदा बंद कारखान्यांना लक्ष्य केले जात असल्याचे समोर आले आहे.
सुरू असलेल्या कारखान्यांमधून कमी जास्त प्रमाणात भंगार चोरीला जाते. परंतु पोलिसांचा ससेमिरा चुकविण्यासाठी अनेकदा तक्र ार न करता याकडे व्यवस्थापनाकडून दुर्लक्ष केले जाते. याचा फायदा मात्र या चोरांकडून घेतला जातो. अनेकदा चोरी केल्यानंतरही तक्र ार दाखल होत नसल्याने अंधाराचा फायदा घेत कोणत्याही कारखान्याच्या आवारात शिरण्याचे धाडस चोरांकडून केले जाते. या भंगार चोरांना स्थानिक भंगार व्यावसायिकांचे सहकार्य असल्याची चर्चा आहे. त्यामुळे गुन्हा दाखल झालाच तर आपल्याला सोडविण्यासाठी कोणीतरी आहे असा विश्वास असल्याने चोऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. यावर कुणाचेही नियंत्रण नसल्याने स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण असून या भंगार चोरांवर कारवाई करण्याची मागणी होत आहे. (वार्ताहर)

Web Title: Scrape the thieves!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.