शाळेची भिंत पडून विद्याथ्र्याचा मृत्यू
By Admin | Updated: October 14, 2014 02:09 IST2014-10-14T02:09:04+5:302014-10-14T02:09:04+5:30
वसईतील शिरसाड येथे जिल्हा परिषदेच्या शाळेची भिंत पडून निखिल टोकरे (9) हा विद्यार्थी गंभीररीत्या जखमी झाला. उपचारासाठी मुंबईला नेत असताना त्याचा मृत्यू झाला.

शाळेची भिंत पडून विद्याथ्र्याचा मृत्यू
पारोळ : वसईतील शिरसाड येथे जिल्हा परिषदेच्या शाळेची भिंत पडून निखिल टोकरे (9) हा विद्यार्थी गंभीररीत्या जखमी झाला. उपचारासाठी मुंबईला नेत असताना त्याचा मृत्यू झाला. तो चौथीत शिकत होता. शाळेच्या मधल्या सुटीत दुपारी 1.3क् च्या सुमारास मुले पटांगणात खेळत होती. तेव्हा शाळेची भिंत पडून येथे खेळत असलेला निखिल गंभीर जखमी झाला. त्याला उपचारासाठी मुंबई येथे हलवण्यात आले. पण उपचार मिळण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला.