न्यू हॉरिझोनमध्ये शालेय साहित्यांची सक्ती
By Admin | Updated: March 19, 2017 05:35 IST2017-03-19T05:35:33+5:302017-03-19T05:35:33+5:30
शालेय पुस्तकांवर विशिष्ट कंपनीच्या किमतींचे लेबल काढून शाळा प्रशासनाकडून नेहमीच चढ्या दराने पुस्तकांची विक्र ी केली जात आहे. या किमतींवर कुणाचेच नियंत्रण

न्यू हॉरिझोनमध्ये शालेय साहित्यांची सक्ती
- अरुणकुमार मेहत्रे, कळंबोर्ली
शालेय पुस्तकांवर विशिष्ट कंपनीच्या किमतींचे लेबल काढून शाळा प्रशासनाकडून नेहमीच चढ्या दराने पुस्तकांची विक्र ी केली जात आहे. या किमतींवर कुणाचेच नियंत्रण नसल्याचे दिसून येत आहे. शनिवारी खांदा वसाहतीतील न्यू हॉरिझोन शाळेत हाच प्रकार निदर्शनास आला. शालेय पुस्ताकांबरोबरच वह्या, नोटपॅड, क व्हर, ग्राफपेपर, स्क्रॅबबुक आदींचीही सक्ती करण्यात आल्याने पालकांमधून तीव्र संताप व्यक्त करण्यात आला. पालकांच्या वाढत्या विरोधामुळे अखेर शाळा व्यवस्थापनाने नरमाईची भूमिका घेतली.
एकीकडे सरकार दप्तरांचे ओझे कमी करण्याचे फतवे काढते; पण दुसरीकडे खासगी शाळांमध्ये अगदी नर्सरीपासून ते दहावीपर्यंत पुस्तकांचे ओझे मुलांना वाहावे लागते. पनवेल परिसरात खासगी शाळांचे पेव फुटले असून, या शाळांमधून विद्यार्थ्यांकडे एक ग्राहक म्हणून पाहिले जात आहे. शैक्षणिक दर्जा सुधारण्याच्या नावाखाली शाळांकडून शालेय पुस्तके, शैक्षणिक साहित्य खरेदीची सक्ती करून पालकांची आर्थिक लूट केली जात आहे. त्यासाठी विविध प्रकाशने आणि शाळांमध्ये आर्थिक हितसंबंध निर्माण झाले आहेत. त्याचा फटका पालकांच्या खिशाला बसत आहे. शाळेला ‘सॅम्पल कॉपी नॉट फॉर सेल’ असे स्टिकर चिकटविलेली पुस्तके देण्यात येतात. ही पुस्तके अभ्यासक्रमांसाठी बंधनकारक नसतात. मात्र, तरीही खरेदी करण्याची सक्ती केली जाते. हीच परिस्थिती तर शालेय साहित्याबाबत आहे.
खांदा वसाहतीतील न्यू हॉरिझोन शाळेत आगामी शैक्षणिक वर्षासाठी पुस्तकांबरोबरच वह्या, नोटपॅड, पेन्सिल्स, कव्हर, स्टिकर, चित्रकलेची वही, क्राफ्टपेपर आदी वस्तूंची आवश्यक नसताना खरेदीची सक्ती करण्यात येत आहे. त्याचबरोबर काही पुस्तकांच्या किमती वाढविण्यात आलेल्या आहेत. सातवीकरिता रत्नासागर पब्लिकेशनच्या समाजशास्त्राच्या पुस्तकाची किंमत जवळपास साडेचारशे रुपये लावण्यात आली आहे. या व्यतिरिक्त इतर पुस्तकांच्या किमती तीनशे रुपयांचा घरात आहेत. केवळ सातवीच नव्हे, तर इतर वर्गांकरिता जास्त किमतीचे पुस्तक घेण्याची सक्ती करण्यात येत आहे. नवीन शैक्षणिक वर्षाकरिता शनिवारी शाळेमध्ये शिवम बुक्सच्या वतीने पुस्तक आणि शालेय साहित्य उपलब्ध करून देण्यात आले. त्यावेळी हा प्रकार लक्षात आल्याने पालकांनी नाराजी व्यक्त केली.
पुस्तकाच्या किमती या पब्लिकेशनकडून ठरवण्यात येतात, त्या वाढविण्याचा विषयच येत नाही. पुस्तक, वह्या, तसेच इतर साहित्य असा संच विद्यार्थ्यांना दिला जातो. मात्र, काही वस्तू मागील वर्षाच्या असतील. त्यानुसार जे साहित्य हवे तेच देण्याबाबत संबंधितांना सूचना दिल्या जातील.
- प्रशांत मूकवार, मुख्याध्यापक
न्यू हॉरिझोन, खांदा वसाहत