शाळेची घंटा वाजली नाही

By Admin | Updated: December 10, 2015 01:58 IST2015-12-10T01:58:58+5:302015-12-10T01:58:58+5:30

शिक्षकांच्या संघटनेने पुकारलेल्या शाळा बंद आंदोलनात अनुदानित शाळा उत्स्फूर्तपणे सहभागी झाल्याने बुधवारी शाळेची घंटा वाजली नाही.

The school bell does not ring | शाळेची घंटा वाजली नाही

शाळेची घंटा वाजली नाही

अलिबाग : शिक्षकांच्या संघटनेने पुकारलेल्या शाळा बंद आंदोलनात अनुदानित शाळा उत्स्फूर्तपणे सहभागी झाल्याने बुधवारी शाळेची घंटा वाजली नाही. गुरुवारीही शाळा बंद राहणार असून येत्या आठ दिवसांत अधिवेशनात सरकारने योग्य निर्णय न घेतल्यास बेमुदत शाळा बंद ठेवण्यात येणार असल्याचा इशारा महाराष्ट्र राज्य शिक्षण बचाव कृती समितीचे जिल्हा निमंत्रक शेषराव सोनुने यांनी दिला.
शाळा बंद असल्याने बुधवारी शाळेच्या इमारतींमध्ये आणि परिसरामध्ये शुकशुकाट होता. विनाअनुदानित असणाऱ्या शाळांनी मात्र या आंदोलनात सहभाग घेतला नाही. राज्य सरकारच्या अशैक्षणिक धोरणाचा निषेध करण्यासाठी राज्यातील सर्व शिक्षक संघटनांनी ९ आणि १० डिसेंबरला शाळा बंद आंदोलन पुकारले आहे. शाळेला सुटी असल्याने विद्यार्थ्यांची प्रवासी वाहतूक करणाऱ्या विविध स्कूल बसेस, आॅटो रिक्षांनाही ब्रेक लागला होता.
शिक्षकांच्या मागण्यांबाबत सरकारने लवकरच निर्णय घ्यावा, त्यांच्या प्रश्नांमुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे, असा सूर पालक वर्गातून आळवला जात होता. सरकारने मोफत शिक्षण देणार असल्याचे सांगितले, मात्र तसे कोठे होताना दिसत नाही त्यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान सरकार करीत आहे, असेही सोनुने यांनी सांगितले. (प्रतिनिधी)

Web Title: The school bell does not ring

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.