फांगणे गावात भरली आज्जींची शाळा
By Admin | Updated: March 10, 2016 02:00 IST2016-03-10T02:00:04+5:302016-03-10T02:00:04+5:30
वय झाले तरी शिक्षण घ्यावे वाटते, याचा एक अनोखा उपक्र म मुरबाड तालुक्यातील फांगणे राबविण्यात आला. ३५० लोकवस्तीच्या या गावामधे मंगळवारी उत्साहाचे वातावरण होते

फांगणे गावात भरली आज्जींची शाळा
धसई : वय झाले तरी शिक्षण घ्यावे वाटते, याचा एक अनोखा उपक्र म मुरबाड तालुक्यातील फांगणे राबविण्यात आला. ३५० लोकवस्तीच्या या गावामधे मंगळवारी उत्साहाचे वातावरण होते. रस्ते सुंदर रांगोळ्या काढून सजवले होते. गावातील महिला व पुरु षांनी प्राथमिक शाळेजवळ गर्दी केली होती. निमित्त होते आज्जीबाईच्या शाळेचे.
या शाळेच्या उद्घाटनासाठी गावातील प्राथमिक शाळेचे विद्यार्थी ढोल ताशा घेऊन उभे होते. सर्व आज्जीबाई हातात दप्तर घेऊन जमा झाल्यावर मिरवणुकीला सुरवात झाली.
आज्जीबार्इंसोबत सुना, नातवंडे, प्रमुख पाहुणे व खास वृद्ध महिलांसाठी हा अनोखा उपक्र म राबविणारे उद्योजक दिलीप भाई दलाल त्यांच्या मातोश्री इंदुबाई दलाल, ठाणे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य संजय पवार, मुरबाड पंचायत समितीचे माजी सदस्य अनिल घरत, शिक्षण प्रेमी किसन चौधरी त्यांच्या पाठीमागे ग्रामस्थ अशी ही मिरवणूक आज्जीबाईच्या शाळेपर्यंत वाजत गाजत आली. या शाळेचे उद्घाटन अंबरनाथच्या आज्जीबाई इंदुबाई मोतीराम दलाल यांच्या हस्ते करण्यात आले. सुमारे २७ आज्जीबाईनी या शाळेत प्रवेश घेतला.
शाळेच्या पहिल्याच दिवशी सर्व विद्यार्थ्यांना शाळेचा गणवेश म्हणजे लुगडे कै.मोतीराम गणपत दलाल धर्मदायी न्यासा तर्फे इंदुबाई दलाल यांचे हस्ते वाटप करण्यात आले. त्याच बरोबर वही पेन अन् पुस्तकेही देण्यात आली. जागतिक महिला दिन निमित्त खास शाळा सुरु करावी, असा फांगणे प्राथमिक शाळेचे मुख्यध्यापक योगेंद्र बांगर व गावच्या ग्रामस्थांचा विचार यामुळे प्रत्यक्षात अंमलात आली.