संतोष कुमार झा कोकण रेल्वेचे नवे व्यवस्थापकीय संचालक

By कमलाकर कांबळे | Updated: March 31, 2024 19:36 IST2024-03-31T19:36:30+5:302024-03-31T19:36:49+5:30

यापूर्वी त्यांनी रेल्वेच्या प्रमुख विभागांमध्ये ऑपरेशन्सचे प्रमुख पदही भूषविले आहे,

Santosh Kumar Jha is the new Managing Director of Konkan Railway | संतोष कुमार झा कोकण रेल्वेचे नवे व्यवस्थापकीय संचालक

संतोष कुमार झा कोकण रेल्वेचे नवे व्यवस्थापकीय संचालक

नवी मुंबई : कोकण रेल्वेचे व्यवस्थापकीय संचालक तथा अध्यक्षपदी संतोष कुमार झा यांची नियुक्ती करण्यात आली आहे. संतोष कुमार झा हे १९९२ च्या बॅचचे भारतीय रेल्वे वाहतूक सेवा (आयआरटीएस) अधिकारी आहेत. ते साेमवारी कोकण रेल्वेच्या बेलापूर येथील मुख्यालयात पदभार स्वीकारणार आहेत.

झा यांना ऑपरेशन्स, इन्फ्रास्ट्रक्चर प्लॅनिंग आणि बिझनेस डेव्हलपमेंटमध्ये २८ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव आहे. यापूर्वी त्यांनी रेल्वेच्या प्रमुख विभागांमध्ये ऑपरेशन्सचे प्रमुख पदही भूषविले आहे, तसेच त्यांनी लॉजिस्टिक क्षेत्रातील महत्त्वपूर्ण व्यावसायिक युनिट्सचे नेतृत्वही केले आहे. त्याचप्रमाणे मल्टी-मॉडेल लॉजिस्टिक हब, साइडिंग्स आणि प्रायव्हेट फ्रेट टर्मिनल्स (पीएफटी) स्थापन करण्यात त्यांचा मोलाचा वाटा राहिला आहे. विशेष म्हणजे, कोकण रेल्वेच्या चेअरमनपदी नियुक्तीपूर्वी संतोष कुमार झा यांनी कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडमध्ये संचालक (ऑपरेशन आणि कमर्शिअल) म्हणून काम केले आहे. त्यामुळे त्यांच्या नव्या भूमिकेचा कोकण रेल्वेच्या विकासात नक्कीच फायदा होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

Web Title: Santosh Kumar Jha is the new Managing Director of Konkan Railway