संतोष गुरव यांचे अपघाती निधन

By Admin | Updated: February 23, 2017 06:21 IST2017-02-23T06:21:15+5:302017-02-23T06:21:15+5:30

येथील लगोरी, कराटे, वुडबॉल, तलवारबाजी आदी खेळांतील आंतरराष्ट्रीय खेळाडू आणि महाराष्ट्र

Santosh Gurav's accidental demise | संतोष गुरव यांचे अपघाती निधन

संतोष गुरव यांचे अपघाती निधन

नागोठणे : येथील लगोरी, कराटे, वुडबॉल, तलवारबाजी आदी खेळांतील आंतरराष्ट्रीय खेळाडू आणि महाराष्ट्र तसेच भारतीय लगोरी संघटनेचे सचिव संतोष गुरव (४२) यांचे बुधवारी पहाटे मुंबई - नाशिक महामार्गावर शहापूरनजीक झालेल्या अपघातात निधन झाले.
गुरव जळगाव येथे होणाऱ्या राज्यस्तरीय लगोरी स्पर्धेसाठी रायगडच्या खेळाडूंसमवेत जळगावकडे जात असताना हा अपघात झाला. अपघातात चालक गंभीर जखमी झाला असून गाडीमधील लगोरी संघातील रायगडच्या खेळाडूंना किरकोळ दुखापत झाली. गुरव यांच्या अपघाती मृत्यूचे वृत्त दुपारच्या दरम्यान संपूर्ण जिल्ह्यात पसरल्याने या अकाली मृत्यूने खेळाडूंसह नागरिकांमध्ये सर्वच ठिकाणी हळहळ व्यक्त करण्यात आली. त्यांचे पार्थिव सायंकाळी नागोठण्यात आणल्यानंतर रात्री उशिरा त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, दोन मुले, भरत, संदीप असे दोन भाऊ असून ते देखील आंतरराष्ट्रीय खेळाडू आहेत. (वार्ताहर)

Web Title: Santosh Gurav's accidental demise