संजय घरत पनवेल पालिकेचे आयुक्त?

By Admin | Updated: September 30, 2016 04:14 IST2016-09-30T04:14:33+5:302016-09-30T04:14:33+5:30

रायगड जिल्ह्यातील पहिली महापालिका म्हणून जिचा गौरव होतो, ती पनवेल महापालिका १ आॅक्टोबरपासून अस्तित्वात येते आहे. या महापालिकेच्या आयुक्तपदासाठी

Sanjay Patil Panvel Commissioner? | संजय घरत पनवेल पालिकेचे आयुक्त?

संजय घरत पनवेल पालिकेचे आयुक्त?

कल्याण : रायगड जिल्ह्यातील पहिली महापालिका म्हणून जिचा गौरव होतो, ती पनवेल महापालिका १ आॅक्टोबरपासून अस्तित्वात येते आहे. या महापालिकेच्या आयुक्तपदासाठी कल्याण-डोंबिवलीचे अतिरिक्त आयुक्त संजय घरत यांच्या नावाची चर्चा पालिका वर्तुळात सुरू आहे. तशी मागणी करणारा अर्ज त्यांनी राज्य सरकारकडे केल्याचा दावाही त्याच्या पुष्टीसाठी केला जात आहे. भाजपाच्या ज्येष्ठ नेत्याशी असलेल्या मैत्रीपूर्ण संबंधांचा त्यांना उपयोग होईल, असेही सांगितले जाते आहे. घरत रजेवर असल्याने त्यांची याबाबतची प्रतिक्रिया समजू शकली नाही.
घरत हे अत्यंत हुशार अधिकारी आहेत. कल्याण-डोंबिवली महापालिकेत ते उपायुक्त म्हणून रुजू झाले. डोंबिवली आणि कल्याण या दोन्ही शहरांत त्यांनी वेगवेगळ्या जबाबदाऱ्या पार पाडल्या आहेत. कल्याण-डोंबिवली महापालिकेचा परिवहन उपक्रम सुरू झाला, तेव्हा परिवहन व्यवस्थापक म्हणूनही ते काम पाहत होते. त्या पदावरून त्यांची बदली कधी डोंबिवलीचे उपायुक्त, तर कधी कल्याणचे उपायुक्त अशी झाली. त्यानंतर, ते सामान्य प्रशासन आणि घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त होते. आधीचे आयुक्त रामनाथ सोनवणे यांच्याशी असलेला त्यांचा संघर्ष चर्चेत होता. सोनवणे यांच्यानंतर आयुक्तपदी आलेले ई. रवींद्रन यांच्याशीही नंतरच्या काळात त्यांचे संबंध ताणले गेले. या सर्व पार्श्वभूमीवर घरत हे पनवेल महापालिकेच्या आयुक्तपदासाठी इच्छुक असल्याची चर्चा रंगली. त्यासाठी भाजपाच्या काही नेत्यांनीही शब्द टाकल्याचे कळते. घरत यांना प्रशासकीय कामाचा दांडगा अनुभव आहे. त्याचा उपयोग पनवेलची घडी बसवण्यासाठी होऊ शकतो.

Web Title: Sanjay Patil Panvel Commissioner?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.