भिवंडीत संजय गांधी निराधार योजनेचा बोजवारा
By Admin | Updated: October 28, 2014 23:10 IST2014-10-28T23:10:00+5:302014-10-28T23:10:00+5:30
संजय गांधी निराधार योजनेतून तालुक्यातील सत्तर विधवा निराधार महिलांना वर्षभरापासून अनुदान मंजूर करूनही मिळाले नाही.

भिवंडीत संजय गांधी निराधार योजनेचा बोजवारा
अनगाव : संजय गांधी निराधार योजनेतून तालुक्यातील सत्तर विधवा निराधार महिलांना वर्षभरापासून अनुदान मंजूर करूनही मिळाले नाही. त्यामुळे लाभाथ्र्याना सरकारी आर्थिक मदतीपासून वंचित रहावे लागते आहे. अनुदान मंजूर होऊनही वाटप न करणा:या भिवंडीच्या तहसील कर्मचा:यांवर कारवाई करण्याची मागणी श्रमजीवी संघटनेचे अशोक सापटे यांनी तहसिलदार वैशाली लंबाते यांच्याकडे केली आहे.
तालुक्यातील 7क् निराधार महिलांच्या आर्थिक मदतीचे प्रस्ताव वर्षभरापूर्वी तहसील कार्यालयात झालेल्या सभेत मंजूर केले आहेत. त्यामध्ये श्रवणबाळ, संजयगांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ योजनांचा समावेश असून लाभाथ्र्याना 6क्क् ते 9क्क् रुपयांची मदत देण्याची तरतूद आहे. मात्र वर्षभरापासून त्याचा लाभ लाभाथ्र्याना मिळाला नाही. यास जबाबदार तहसील कार्यालयातील कर्मचा:यांची चौकशी करून कारवाई करण्यात यावी, अशी मागणी महिलांनी केली आहे.
(प्रतिनिधी)
लाभार्थी अनुदानापासून वंिचत आहेत हे खरे आहे. श्रमजीवी संघटनेने या विषयी तक्रार केली असून अनुदान वाटपा संबंधी चौकशी करून संबंधितांना अनुदान देण्यासाठी प्रयत्न करणार आहे.
- वैशाली लंबाते,
तहसिलदार, भिवंडी