यूपीच्या रिव्हॉल्व्हरची ठाण्यात विक्री
By Admin | Updated: October 1, 2014 02:36 IST2014-10-01T02:36:38+5:302014-10-01T02:36:38+5:30
गेल्या आठवडय़ापासून राबविलेल्या एका विशेष मोहिमेत ठाणो पोलिसांनी लाखो रुपयांची 17 अग्निशस्त्रे हस्तगत केली.

यूपीच्या रिव्हॉल्व्हरची ठाण्यात विक्री
>ठाणो : निवडणुका स्वच्छ आणि भयमुक्त वातावरणात पार पडण्यासाठी निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार गेल्या आठवडय़ापासून राबविलेल्या एका विशेष मोहिमेत ठाणो पोलिसांनी लाखो रुपयांची 17 अग्निशस्त्रे हस्तगत केली. यात 17 बंदुकांसह 38 काडतुसांचा समावेश आहे. यातील काही शस्त्रे उत्तर प्रदेशच्या वाराणसीतून 25 हजारांना आणून ती ठाणो परिसरात 5क् ते 6क् हजारांना विकल्याचीही माहिती उघड झाली आहे.
गुन्हे अन्वेषण विभागाच्या कल्याण, भिवंडी, ठाणो आणि मध्यवर्ती पथकांनी गेल्या काही दिवसांमध्ये राबविलेल्या मोहिमेची माहिती पोलीस उपायुक्त पराग मणोरे यांनी दिली. कल्याणच्या युनिट 3चे पोलीस निरीक्षक शिवाजी धुमाळ यांच्या पथकाने 21 सप्टेंबर रोजी सुरेश रामजी सिंग (42 रा. तळोजा, एमआयडीसी) याच्याकडून एक पिस्तूल, 2 रिव्हॉल्व्हर आणि 15 काडतुसे हस्तगत केली. विशेष म्हणजे सुरेश हा तळोजामध्ये सुरक्षारक्षक म्हणून काम करतो. त्याने वाराणसी (यूपी) येथून 25 ते 3क् हजारांमध्ये एक रिव्हॉल्व्हर विकत घेतले. ते कल्याण परिसरात 5क् ते 6क् हजारांना तो विकत असे. त्याने योगेश पाटील याला एक रिव्हॉल्व्हर आणि 5 काडतुसे 55 हजारांना विकली होती. 24 सप्टेंबर रोजी त्याच्याकडून हे रिव्हॉल्व्हर आणि काडतुसे हस्तगत करण्यात आली. सुरेशचा यूपीचा साथीदार दीपक लाला आणि ज्या टोळीकडून ही शस्त्रे विकत घेतली जायची, त्यांचा शोध घेण्यासाठी ठाणो पोलीस वाराणसीला रवाना झाले आहेत.
24 सप्टेंबर रोजी ठाणो खंडणीविरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक एन.टी. कदम यांच्या पथकाने माजिवडा पॉवर हाउस भागातून मुन्ना गोसावी (39) याच्याकडून एक गावठी बनावटीचा कट्टा आणि 3 काडतुसे हस्तगत केली.
याशिवाय, 26 सप्टेंबर रोजी सखाराम वाघमारे (2क्, रा. देवघर, जि. पुणो), जावेद अन्सारी (23, रा. मुंब्रा), महेंद्र वाघे (26, रा. मुंब्रा), मोईद्दीन अन्सारी (19) यांनाही शस्त्र बाळगल्याप्रकरणी अटक केली आहे. वाघमारे याच्याकडून 7.65 कॅलीबरचे एक पिस्तूल आणि दोन जिवंत काडतुसे हस्तगत करण्यात आली आहेत. महेंद्र आणि रेहान यांच्याकडून दोन गावठी कट्टे आणि 4 काडतुसे जप्त करण्यात आली.
29 सप्टेंबर रोजी चिंतराम ब्राrाणो (19, रा. सेंदवा, मध्य प्रदेश), सुकराज सेन (23, रा. राजस्थान) यांच्याकडूनही 1 लाख 1क् हजारांची 4 पिस्तुले, 1 गावठी कट्टा आणि 5 काडतुसे हस्तगत करण्यात आली.
भिवंडीच्या देवानंद पाटील (4क्) याच्याकडूनही 1 पिस्तूल आणि 3 जिवंत काडतुसे जप्त करून त्याला अटक केल्याची माहिती डोईफोडे यांनी दिली. (प्रतिनिधी)
गावठी कट्टा जप्त
अमली पदार्थविरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक मंदार धर्माधिकारी यांनी ठाण्याच्या आरटीओ कार्यालयासमोरून एकाला मोटारसायकलसह ताब्यात घेऊन त्याच्याकडून एक गावठी कट्टा हस्तगत केला. भिवंडीच्या युनिट 2चे पोलीस निरीक्षक बुधवंत यांच्या पथकाने 3क् सप्टेंबर रोजी एक गावठी कट्टा आणि एक काडतूस बाळगणा:यास अटक केली. याशिवाय, गुन्हे शाखेच्या युनिट 1चे पोलीस निरीक्षक रवींद्र डोईफोडे यांच्या पथकाने तलावपाळी भागातून विजय शिरसाठ (21 रा. लोणावळा, जि. पुणो) याच्याकडून एक गावठी बनावटीचा कट्टा हस्तगत केला आहे. अशाच कारवाया अन्यत्रही केल्या आहेत.