शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
2
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
3
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले
4
आधार कार्ड काढायला घराबाहेर पडले ते परतलेच नाहीत; पेट्रोल पंप मालकाचा २ मुलींसह संशयास्पद मृत्यू
5
Hero: ड्युअल डिस्क ब्रेक्स, मल्टीपल राइडिंग मोड्स आणि बरेच काही; हिरो एक्सट्रीम १२५ आर लॉन्च!
6
Dance Bar Raid: उल्हासनगरातील चांदणी लेडीज सर्व्हिस बारवर पोलिसांची धाड, ९ महिलांसह १५ जणांना अटक
7
अरे देवा! मेट्रो स्टेशन तयार झालं पण नंतर कळालं उंचीच कमी, पुढं जे केलं ते पाहून थक्क व्हाल
8
स्टाँग रूमचे CCTV बंद, मध्यरात्री एका पिकअप व्हॅनची एन्ट्री; RJD च्या आरोपानंतर तपासाचे आदेश
9
चीनने वाढवली लष्करी ताकद! तिसरी विमानवाहू युद्धनौका 'फुजियान' तयार, अमेरिकेची चिंता वाढली
10
कोण आहेत गजाला हाशमी? ज्यांनी अमेरिकेत रचला नवा इतिहास; भारताशी थेट कनेक्शन, जाणून घ्या
11
वीज चमकली की सुरू होतं काउंटडाउन!… काय आहे क्रिकेटच्या मैदानात क्वचित लागू होणारा '30:30 नियम'?
12
चॉकलेट की बिस्किट... आरोग्यासाठी जास्त धोकादायक काय? खाण्याआधी एकदा विचार कराच
13
बिहारमध्ये वाढलेल्या मतदानाचा अर्थ काय, कोणता फॅक्टरमुळे वाढलं मतदान? प्रशांत किशोरांनी मांडलं गणित
14
ब्रिस्बेनच्या मैदानात पावसाची बॅटिंग! टीम इंडियानं ऑस्ट्रेलियाविरुद्धची टी-२० मालिका २-१ अशी जिंकली
15
'...तर आम्ही शिंदेंच्या शिवसेनेसोबतची दोन जिल्ह्यात युती तोडू'; नारायण राणेंचा इशारा, तेलींबद्दल काय बोलले?
16
डॉक्टरच्या लॉकरमध्ये मिळाली AK-47 रायफल, जम्मू-काश्मीर पोलीसही चकित; नेमकं प्रकरण काय?
17
"भैया मत करो...", बाईकवर मागे बसलेल्या तरुणीसोबत रॅपिडो चालकाचं धक्कादायक कृत्य
18
आधी ४५ कोटींचे मेट्रो स्टेशन बनवले, नंतर लक्षात आलं की उंची कमी झाली; मग...; हा जुगाड जाणून डोक्यावर हात माराल
19
Mumbai: कूपर रुग्णालयात मृत रुग्णाच्या नातेवाईकाकडून डॉक्टरांना मारहाण
20
"आधी कर्जबाजारी व्हायचं आणि मग पुन्हा कर्जमाफी मागायची"; राधाकृष्ण विखे पाटलांची शेतकऱ्यांवर आगपाखड

चार रुपयांच्या मास्कची दहा रुपयांना विक्री, निर्णयाला हरताळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 3, 2020 00:30 IST

Navi Mumbai : शासनाकडून मास्कची सक्ती होताच एप्रिल महिन्यापासून शहरात सर्वत्र एन ९५ मास्क हे दोनशे ते तीनशे रुपयांना विकले जात होते.

नवी मुंबई : शासनाने आदेश काढून अनेक ठिकाणी चार रुपयांचा तीन पदरी मास्क दहा रुपयांना विकला जात आहे, तर सुधारित दरानुसार एन ९५ मास्कचा अद्याप पुरवठा झालेला नसल्याने त्याचा तुटवडा भासत आहे. दरम्यान, नागरिकांच्या पसंतीचे फॅन्सी मास्क मात्र ४० ते ६० रुपयांना विकले जात आहेत.शासनाकडून मास्कची सक्ती होताच एप्रिल महिन्यापासून शहरात सर्वत्र एन ९५ मास्क हे दोनशे ते तीनशे रुपयांना विकले जात होते. दोन व तीन पदरी मास्क तीस ते साठ रुपयांना, तर नागरिकांच्या आवडीनुसार फॅन्सी मास्क ५० ते ८० रुपयांना मिळत होते. मात्र, कोरोनाचा प्रसार टाळण्यासाठी सर्वमान्यांना मास्क विकत घेता यावेत, याकरिता फॅन्सी मास्क व्यतिरिक्त एन ९५, तीन पदरी व दोन पदरी मास्कच्या किमतीवर शासनाने मागील आठवड्यात नियंत्रण आणले आहे. यानंतरही अनेक ठिकाणी चार रुपयांचा मास्क दहा रुपयांना विकला जात असल्याचे दिसून येत आहे. त्याकरिता पुरवठा कमी असल्याची कारणे पुढे केली जात आहेत, तर एन ९५ प्रकारातले मास्क शहरात बहुतांश ठिकाणी उपलब्धच नसल्याचे पाहणीत समोर आले. सुरुवातीच्या काही दिवसांत दोनशे ते तीनशे रुपयांना विकले जाणारे हे मास्क मागील तीन महिन्यांत शंभर ते दोनशे रुपयांना विकले जात होते. त्याला मागणीही असल्याने व्यावसायिकांनी त्याचा साठा करून ठेवला होता, परंतु एन ९५ मास्कसाठी १९ ते ४९ रुपये दर निश्चित केल्याने ज्यादा किमतीच्या मास्कची विक्री अनेकांनी थांबवली आहे. काहींनी हा साठा संबंधित पुरवठादाराला परतही पाठवला आहे.

फॅन्सीला अधिक मागणीनव्या दरानुसार एन ९५ मास्कचा अद्याप पुरवठा झालेला नसल्याने मागणी असूनही त्याचा तुटवडा भासत आहे, परंतु फॅन्सी मास्क सर्वत्र उपलब्ध असून, ते ५० ते ८० रुपयांना विकले जात आहेत. त्यास लहान मुलांसह प्रौढांची मागणी वाढत आहे. एन ९५, दोन व तीन लेयर पेक्षा फॅन्सी मास्कला सर्वाधिक पसंती  आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसNavi Mumbaiनवी मुंबई