शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG 5th Test : टीम इंडियानं हातून निसटलेली मॅच जिंकून दाखवली! मालिकेत बरोबरी
2
"हे बंद करा"; परिणय फुकेंच्या विधानावर बोलताना CM फडणवीसांनी माध्यमांचे टोचले कान, काय म्हणाले?
3
मुंबई घडवण्यात हिंदी भाषिकांचं मोठं योगदान, मराठी केवळ ३० टक्के...: निशिकांत दुबेंनी पुन्हा डिवचलं
4
एका शेअरवर १५६ रुपयांचा डिविडंड देणार ही कंपनी, रेकॉर्ड डेट १५ ऑगस्टपूर्वीच, तुमच्याकडे आहे का?
5
“आपला पक्ष मुंबईत सर्वांत जास्त बलवान आहे, यंदा महापालिकेत मनसेचीच सत्ता येणार”: राज ठाकरे
6
एक दिवस एमजी टाटाला मागे टाकणार? जुलैमध्ये एवढ्या विकल्या इलेक्ट्रीक कार... ह्युंदाई क्रेटा...
7
भारतातील एकमेव रेल्वे स्टेशन, ज्याला नावच नाही, तरीही थांबते ट्रेन, लोक करतात प्रवास
8
पंतप्रधान मोदींनंतर चार तासांनी अमित शाह राष्ट्रपतींना भेटले; ५ ऑगस्टला काहीतरी मोठे घडणार....
9
IND vs ENG :मियाँ मॅजिक! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये विकेट; KL राहुलनं एक कॅच सोडला
10
IND vs ENG : क्रिस वोक्सला सलाम! खांदा फॅक्चर असताना संघासाठी मैदानात उतरला (VIDEO)
11
शाहरुख खान अन् राणी मुखर्जीसाठी प्रिय मित्र करण जोहरची पोस्ट, म्हणाला, "३३ वर्षांचा हा काळ..."
12
थ्रेडिंगमुळे लिव्हर फेल? आयब्रो करणं पडेल चांगलंच महागात, डॉक्टरांचा धोक्याचा इशारा
13
१७,००० कोटींचा घोटाळा! अनिल अंबानींच्या डोकेदुखीत वाढ, ED आता 'या' लोकांची चौकशी करणार
14
Post Office ची ५० वर्ष जुनी सेवा होणार बंद, तुमच्यावर काय परिणाम होणार?
15
नव्या प्रभाग रचनेला आव्हान देणाऱ्या याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या; स्थानिक निवडणुकांना हिरवा कंदील
16
६ ऑगस्टला बच्चू कडू राज ठाकरेंची भेट घेण्याची शक्यता; शेतकरी आंदोलनाला मनसेचं पाठबळ मिळणार?
17
लॉटरी लागली! टाटांच्या 'या' शेअरचे होणार १० तुकडे, १०० शेअर्सचे थेट १००० होणार, रेकॉर्ड डेट कधी?
18
मैत्रिणीचा संसार मोडला, नंतर तिच्याच नवऱ्याशी केलं लग्न; आता ३ वर्षांतच अभिनेत्रीवर घटस्फोट घेण्याची वेळ
19
Nagpur: नागपुरात मद्यधुंद अवस्थेत कार चालवणाऱ्या जवानानं ३० जणांना उडवलं, व्हिडीओ व्हायरल!

खाद्यपदार्थातील किरणोत्साराच्या बनावट प्रमाणपत्रांची विक्री, तोतया वैज्ञानिकाविरोधात गुन्हा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2022 13:45 IST

भारतामध्ये तयार केले जाणारे खाद्यपदार्थ देशाबाहेर विक्री करायचे असल्यास त्यासाठी खाद्य पदार्थांमधील अणु किरणोत्सार तपासणी करून घेणे बंधनकारक आहे. ही तपासणी बीआरआयटी या शासनाच्या संस्थेमार्फत केली जाते.

सूर्यकांत वाघमारे

नवी मुंबई : निर्यात केल्या जाणाऱ्या खाद्य पदार्थांमधील अणु किरणोत्सार तपासणीच्या अधिकाऱ्याची बनावट प्रमाणपत्रे विक्री केल्याप्रकरणी तोतया वैज्ञानिकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या तोतया वैज्ञानिकाने स्वतः बीएआरसीमधील सह वैज्ञानिक असल्याचे भासवून दोन खासगी कंपन्यांना हे अधिकार प्रमाणपत्र विकले आहे. हा प्रकार निदर्शनास आल्यानंतर बीआरआयटीच्या तक्रारीवरून एपीएमसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भारतामध्ये तयार केले जाणारे खाद्यपदार्थ देशाबाहेर विक्री करायचे असल्यास त्यासाठी खाद्य पदार्थांमधील अणु किरणोत्सार तपासणी करून घेणे बंधनकारक आहे. ही तपासणी बीआरआयटी या शासनाच्या संस्थेमार्फत केली जाते. या तपासणीत संबंधित खाद्यपदार्थ निर्यात योग्य असल्याचे प्रमाणपत्र मिळाल्यानंतरच संबंधित कंपनी त्यांचे उत्पादन देशाबाहेर विक्री करू शकते. या चाचणीचे संपूर्ण अधिकार बीआरआयटी या शासनाच्या संस्थेकडेच आहेत. त्यानंतरही अणु किरणोत्सार चाचणीचे अधिकार खासगी कंपनीला देखील मिळतात असे भासवून तोतया वैज्ञानिकाने दोन कंपन्यांना बनावट अधिकार प्रमाणपत्राची विक्री केली आहे. यासाठी त्याने प्रमाणपत्रावर बीएआरसीच्या मोहोरचादेखील वापर केला आहे. तर या प्रकारातून त्याने दोन कंपन्यांना सुमारे १० लाख ६० हजारांचा गंडा घातला आहे.वाय. जी. शेखर असे तोतया वैज्ञानिकाचे नाव आहे. त्याने स्वतःला बीएआरसीमधील सहायक वैज्ञानिक असल्याचे सांगून हा प्रकार केला आहे. परमाणू ऊर्जा विभागाने व बीएआरसीने त्याला या कामासाठी नियुक्त केल्याचे सांगून तो तसे पत्रदेखील दाखवत होता. ही बाब केंद्र सरकारच्या परमाणू ऊर्जा विभागाच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी बीआरआयटीला त्याबाबत कळवले होते. त्यानुसार या संस्थेने चौकशी केली असता, संबंधित प्रकार उघड झाला. त्यानुसार बीआरआयटीच्या अधिकाऱ्यांनी केलेल्या तक्रारीवरून एपीएमसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तोतया वैज्ञानिकाने तमिळनाडू येथील दोन कंपन्यांना संपर्क साधून फसवणूक केली आहे. यासाठी त्याने स्वतः मुंबईत बीएआरसीमध्ये वैज्ञानिक असल्याचे बनावट ओळखपत्र वापरून, परमाणू ऊर्जा विभागाने त्याची नियुक्ती केल्याचे बनावट लेटरहेडद्वारे भासविले. या प्रकरणाबाबत अज्ञात व्यक्तीने ईमेलद्वारे भारत सरकारच्या परमाणू ऊर्जा विभागाला कळविले होते. त्यामुळे झालेल्या चौकशीत हा प्रकार उघडकीस आला आहे. 

यामुळे त्या तोतया वैज्ञानिकाची ओळख पटविण्यासाठी पोलिसांना फसवणूक झालेल्या दोन कंपन्यांच्या संबंधित अधिकाऱ्यांची भेट घ्यावी लागणार आहे. या प्रकरणावरून नवी मुंबईत तोतया वैज्ञानिकांमार्फत फसवणुकीच्या घटना घडत असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. यापूर्वी देखील ऐरोली येथील एका तरुणीला तोतया वैज्ञानिकाने लग्नाचे आमिष दाखवून फसविल्याची घटना घडली आहे.

बीआरआयटीच्या अधिकाऱ्यांच्या तक्रारीवरून तोतया वैज्ञानिकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याने बीएआरसी व परमाणू ऊर्जा विभाग यांचे बनावट शिक्के वापरून फसवणूक केली आहे. मात्र, प्रत्यक्षात त्याला कंपनीच्या संबंधितांव्यतिरिक्त इतर कोणी पाहिलेलं नाही. त्यामुळे त्याची ओळख पटवण्यासाठी फसवणूक झालेल्या कंपनीच्या अधिकाऱ्यांची चौकशी महत्त्वाची आहे. त्यानंतर पुढील तपासाला दिशा मिळणार आहे. - नितीन सांगळे, पोलीस उपनिरीक्षक, एपीएमसी पोलीस ठाणे. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीNavi Mumbaiनवी मुंबई