शहरं
Join us  
Trending Stories
1
' भारतीय अपमान सहन करीत नाहीत, अमेरिकेच्या दबावापुढे भारत कधीच झुकणार नाही' : पुतिन
2
...तर पाकिस्तान जागतिक नकाशावर दिसणार नाही! भारतीय लष्करप्रमुखांनी खडसावले 
3
अमेरिकी रस्त्यावर भारतीय बाइक्सने अभिमान वाटतो; राहुल यांनी अमेरिकेत केला भारतीय कंपन्यांचा गौरव
4
लेह हिंसाचार : सोनम वांगचुक यांना अटक; न्याय मागण्यासाठी पत्नी कोर्टात
5
‘बाबा’ विद्यार्थिनींना रात्री खोलीत येण्यास भाग पाडायचा; मिळाली १४ दिवस कोठडी
6
आता सौरऊर्जेवर चालणारी ई-बुलेट आली; ऊर्जाबचत, प्रदूषण नियंत्रणासाठी मोठा फायदा
7
पाकिस्तानवर हसावं की रडावं.... आता म्हणे मोहसीन नक्वीला गोल्ड मेडल देणार, सन्मान करणार !
8
लाखोंच्या गर्दीत हरवलेला 'मुन्ना' काही मिनिटांत 'अण्णा'च्या गळ्यात; बापलेकांची भावनिक भेट
9
सानिया मिर्झाशी घटस्फोट, आता शोएब मलिकचे सना जावेदशीही लग्न तुटणार? VIDEO मुळे उडाली खळबळ
10
ट्रॅक्टरमध्ये बसून थेट बांधावर... सोलापूरच्या अधिकाऱ्यांची तत्परता, शेतकऱ्यांना दिला धीर
11
'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ
12
२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना कफ सिरप देऊ नका, केंद्राचा सल्ला; राजस्थान, मध्य प्रदेशात ११ बालकांचा मृत्यू
13
वेळागर समुद्रात आठजण बुडाले; तिघांचे मृतदेह हाती, एकीचा जीव वाचला, किनाऱ्यावर आक्रोश
14
राज्यात अतिवृष्टी, पूरस्थिती; अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची ४-६ ऑक्टोबरला अंतिम विशेष फेरी
15
शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर; नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी राज्यभर आंदोलन
16
“बावळट-मूर्ख, मनोज जरांगेंसारखा नेता मिळणे मराठ्यांचे दुर्दैव”; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
17
"तुम्ही आम्हाला शिकवू नका..."; भारताने पाकिस्तानला चांगलंच सुनावलं, UN मध्ये काय घडलं?
18
आशाबाई, अंबिका अन् सुनीता... सोलापुरात दोन दिवसांत तीन महिलांची हत्या, कारण एकच
19
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव; PM मोदींची राज्य सरकारच्या निर्णयाला मंजुरी
20
IND vs AUS : तिलक वर्माचं शतक थोडक्यात हुकलं; ऑस्ट्रेलियाविरुद्ध अभिषेकवर 'गोल्डन डक'ची नामुष्की

फळे पिकवण्याचा बनावट पावडरची विक्री; एपीएमसीतून साठा जप्त

By सूर्यकांत वाघमारे | Updated: March 20, 2024 16:19 IST

विक्रेत्यांसह पुरवठादारांवर गुन्हा दाखल

नवी मुंबई : फळे पिकवण्यासाठी बनावट पावडर विक्री होत असल्याचा प्रकार उघड झाला आहे. सदर पावडर बनावट असल्याचे माहिती असतानाही ती पुरवल्याने व त्याची विक्री केल्याप्रकरणी संबंधितांवर एपीएमसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

फळे पिकवण्यासाठी रसायनांचा वापर होत असल्याच्या तक्रारी अनेकदा येत असतात. मात्र अशा कृत्रिम पिकलेल्या फळांमुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे रसायनांद्वारे फळे पिकवण्याला विरोध होत असतानाच फळे पिकवण्यासाठी बनावट पावडर देखील वापरली जात असल्याचे समोर आले आहे. यासंदर्भात एका कंपनीने पोलिसांकडे तक्रार केली होती.

त्यानुसार एपीएमसी पोलिसांच्या पथकाने मंगळवारी फळ मार्केट परिसरातील काही ठिकाणांची झाडाझडती घेतली. त्यामध्ये सुयोग्य स्टेशनरी, सिद्धिविनायक स्टेशनरी याठिकाणी फळे पिकवण्याची बनावट पावडर आढळून आली. कुमार बुधवानी व बंटी तलरेजा यांनी त्यांना हि पावडर उपलब्ध करून दिली होती. एपीएमसी आवारात एका कंपनीमार्फत चायना येथून मागवलेली फळे विक्रीची पावडर पुरवली जाते. त्याचीही बनावट नकल तयार करून संबंधितांकडून ते खरे असल्याचे भासवून विक्री केली जात होती. त्यांच्याकडून १ लाख ८४ हजार रुपये किमतीची बनावट पावडर हस्तगत करण्यात आली आहे. याप्रकरणी एपीएमसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस अधिक तपास करत आहेत.