रायन शाळेत विद्यार्थिनीला मारहाण
By Admin | Updated: June 25, 2014 01:33 IST2014-06-25T01:33:57+5:302014-06-25T01:33:57+5:30
सानपाडा येथील रायन इंटरनॅशनल स्कूलमध्ये आयुषी पाटील या चार वर्षाच्या मुलीला मारहाण करण्यात आली.

रायन शाळेत विद्यार्थिनीला मारहाण
>नवी मुंबई : सानपाडा येथील रायन इंटरनॅशनल स्कूलमध्ये आयुषी पाटील या चार वर्षाच्या मुलीला मारहाण करण्यात आली. याविषयी तुर्भे पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला आहे. सेक्टर 2 मधील प्रवीण पाटील यांची मुलगी आयुषी रायन शाळेत माँटेसरीमध्ये शिकते. सोमवारी शाळेत तिला अज्ञात व्यक्तींनी मारहाण केली. तिच्या शरीरावर जखमा झाल्या आहेत. तिला तीन वाजता घरी घेऊन येण्यासाठी आई शिल्पा पाटील शाळेत गेल्या असताना मुलगी जखमी झाल्याचे लक्षात येताच त्यांना धक्काच बसला. शाळा व्यवस्थापनाला नेमके कारण सांगता आले नाही. मुलगी घाबरली असून फक्त दादाने मारले एवढेच सांगते. पालकांनी काँग्रेसचे रोजगार विभागाचे अध्यक्ष रवींद्र सावंत यांच्या मदतीने तुर्भे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. शाळा व्यवस्थापनाशी संपर्क साधला, परंतु त्यांची प्रतिक्रिया उपलब्ध होऊ शकली नाही.