घरफोडी करणाऱ्याच्या आवळल्या मुसक्या
By Admin | Updated: July 7, 2017 06:35 IST2017-07-07T06:35:29+5:302017-07-07T06:35:29+5:30
नेरळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत महिनाभरापूर्वी चार ठिकाणी घरफोडी होऊन लाखो रुपयांचा माल लंपास करण्यात आला होता. यासंदर्भात

घरफोडी करणाऱ्याच्या आवळल्या मुसक्या
लोकमत न्यूज नेटवर्क
नेरळ : नेरळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत महिनाभरापूर्वी चार ठिकाणी घरफोडी होऊन लाखो रुपयांचा माल लंपास करण्यात आला होता. यासंदर्भात नेरळ पोलिसांनी तपासासाठी दोन पथके तयार केली होती. त्यानुसार घरफोडी करण्याकरिता वापरण्यात आलेली मोटारसायकल खोपोली येथील रेल्वे पार्किंगमध्ये मिळून आली होती. त्यामुळे आरोपी हा वांगणी दिशेने गेल्याची गोपनीय माहिती मिळाल्याने येथील तपास टीमला माहिती दिली. त्यानुसार नेरळ पोलिसांनी संशयित आरोपीस वांगणी येथून ताब्यात घेतले आहे.
पकडलेल्या आरोपीकडून सोने, चांदी व इतर मुद्देमालासह चार लाख रु पये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. कर्जत तालुक्यातील डिकसळ येथे राहणारे हिराबाई दुबे यांच्या घरात २२ जून रोजी दिवसा घरफोडी झाली. त्यानुसार गुन्हा दाखल करून त्याची माहिती तत्काळ उपविभागीय पोलीस अधिकारी जालिंदर नालकुल कर्जत विभागाला दिली होती. गुन्हा घडल्यानंतर तत्काळ पोलीस उपविभागीय अधिकारी जालिंदर नालकुल, नेरळचे प्रभारी अधिकारी सोमनाथ जाधव, पोलीस उपनिरीक्षक आर. एन. तडवी, मोहिते, कदम व पोलीस कर्मचाऱ्यांनी तपास सुरू केली, आणि खबऱ्याकडून मिळालेल्या माहितीनुसार सापळा रचून वांगणी येथून संशयित आरोपीला ताब्यात घेण्यात आले.