Rumors of a bomb in the local | लोकलमध्ये बॉम्बची अफवा

लोकलमध्ये बॉम्बची अफवा

पनवेल : वडाळा येथून पनवेल येथे आलेल्या ट्रेनमध्ये बॉम्ब असल्याची अफवा एका तरुणाने रविवारी सकाळी पावणेनऊच्या सुमारास पसरवली. त्यामुळे बॉम्बशोधक पथक, लोहमार्ग पोलीस, अग्निशमन दल, आरपीएफ यांनी रेल्वे तपासणी केली. मात्र, त्यांना बॉम्बसदृश कोणतीही वस्तू सापडली नाही. दरम्यान, पोलिसांनी जगन्नाथ काशिनाथ शेट्टी (३७, कामोठे) या तरुणाला ताब्यात घेतले आहे.
आज रविवार १५ मार्च रोजी सकाळी पावणेनऊच्या सुमारास वडाळा येथून पनवेल स्टेशनला एक लोकल ट्रेन आली. ही लोकल ट्रेन रिकामीच कारशेडला जाणार होती. या ट्रेनमधून एक तरुण खाली उतरला व स्टेशन मास्तरच्या रूममध्ये जाऊन सदर ट्रेनमध्ये बॉम्ब असल्याचे त्याने सांगितले. या प्रकारामुळे सारेच घाबरले. त्यामुळे लागलीच बॉम्ब शोधक पथक, लोहमार्ग पोलीस, अग्निशमन दल, आरपीएफ, श्वान पथक यांना घटनास्थळी बोलावण्यात आले.

Web Title: Rumors of a bomb in the local

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.