रिसमध्ये बोगस डॉक्टरला अटक
By Admin | Updated: April 29, 2017 01:46 IST2017-04-29T01:46:27+5:302017-04-29T01:46:27+5:30
महाराष्ट्रात बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट झाला आहे. अनेक ठिकाणी बोगस डॉक्टर सापडल्याच्या घटना ताजा

रिसमध्ये बोगस डॉक्टरला अटक
मोहोपाडा : महाराष्ट्रात बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट झाला आहे. अनेक ठिकाणी बोगस डॉक्टर सापडल्याच्या घटना ताजा असतानाच रिस येथे बोगस डॉक्टर पकडल्याची घटना घडली.
डॉ. प्रसाद बाबुराव रोकडे (४९) लोहोप आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी यांनी रसायनी पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्याने रसायनी पोलिसांनी रिस येथील भजनसिंग पुरणसिंग (६८) यास ताब्यात घेतले असून त्या डॉक्टरची तपासणी केली असता पोलिसांना त्याच्याकडे कोणतेही वैद्यकीय व्यवसाय करण्याचे प्रमाणपत्र नसताना गरजू रुग्णांना आयुर्वेदिक औषधे पुरवत असून बोगस डॉक्टर असल्याचे आढळून आले. याबाबत रसायनी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद होऊन पुरणसिंग याला अटक करण्यात आली आहे. याबाबत पोलीस निरीक्षक दत्तात्रेय बोराटे यांच्या मार्गदर्शनाखाली सहा.पो.नि धनंजय तेलगोटे अधिक तपास करीत आहेत.