उरण : होळीच्या पूर्वसंध्येला उरण बाजारपेठेतील नामांकित टिपटॉप इलेक्ट्रॉनिक्सचे दुकान फोडून अज्ञात चोरट्यांनी १७ लाख २४ हजार ८०० रुपये किंमतीचे ५३ एलईडी टीव्ही संच चोरून पोबारा केला. बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास भर बाजारपेठेतील दुकानावर अज्ञात चोरट्यांनी टाकलेल्या धाडसी दरोड्यामुळे व्यापारीवर्गात घबराट पसरली आहे.उरण बाजारपेठेतील टिपटॉप इलेक्ट्रॉनिक्सचे दुकान आहे. बुधवारी मध्यरात्री सर्वत्र होळी सणाची धूम असल्याचा फायदा उठवित अज्ञात चोरट्यांनी मध्यरात्री १ ते ३ वाजताच्या दरम्यान दुकानाच्या मागील असलेल्या शटर्सचे कु लूप पहार अथवा विविध कंपन्यांचे ५३ एलईडी टीव्ही संच आणि दोन इस्त्री असा १७ लाख २४ हजार ८०० रुपये किंमतीचा ऐवज चोरून नेला. गुरुवारी सकाळी दुकानाच मालक रणछोड चंदात दुकान उघडण्यास गेले असता चोरीचा प्रकार उघडकीस आल्यानंतर तत्काळ त्यांनी उरण पोलिसांकडे धाव घेतली. एसीपनी दिलीप गोरे, उरण पोलीस ठाण्याचे वपोनि राजेंद्र गलांडे यांनी पोलीस पथकासह घटनास्थळी धाव घेतली. या प्रकरणी गुन्हा दाखल करून तपासाला सुरूवात केली असल्याची माहिती तपास अधिकारी मनोज पवार यांनी दिली. डॉग स्कॉड, ठसे तज्ज्ञांनाही पोलिसांनी पाचारण केले होते. (वार्ताहर)
इलेक्ट्रॉनिक्स दुकानावर दरोडा
By admin | Updated: March 6, 2015 23:52 IST