नवी मुंबई : नवी मुंबई शहरात अनेक ठिकाणी महापालिकेच्या माध्यमातून गटारे दुरु स्तीची कामे सुरू आहेत. या कामासाठी रस्त्याच्या कडेला खोदकाम करण्यात आले असून, रस्त्याचा काही भाग अडविण्यात आला आहे. यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत असून, अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे.नवी मुंबई महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुका काही दिवसांवर येऊन ठेपल्या असून, महापालिकेच्या माध्यमातून शहरात विविध कामे करण्याचा सपाटा लावण्यात आला आहे. सानपाडा येथील सीताराम मास्तर उद्यानाच्या शेजारील रस्त्याच्या कडेला असलेल्या पावसाळी गटारांची दुरु स्ती करण्यात येत असून जुने गटार तोडण्यात आले आहे. जेसीबीच्या साहाय्याने गटारातील गाळ रस्त्यावर टाकण्यात आला असून, वाहनचालकांना वाहनांची ने-आण करताना विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे.वाशी रेल्वे स्थानकाजवळ युटिलिटी डक्टचे काम सुरू असून, मोठ्या प्रमाणावर खोदकाम करण्यात आले आहे. या ठिकाणाहून वाहनांची वर्दळ मोठ्या प्रमाणावर असून, रस्त्याच्या खोदकामामुळे चालकांना वाहतूककोंडीच्या समस्येला सामोरे जावे लागत आहे. या प्रकाराकडे महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष झाले असून, यामुळे अपघात घडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
रस्त्यांच्या खोदकामांचा सानपाड्यात वाहतुकीला अडथळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 29, 2020 01:02 IST