शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Jarange Patil : "मी थोड्या दिवसांचा पाहुणा..."; मनोज जरांगे पाटील यांना अश्रू अनावर, मराठ्यांना भावनिक साद
2
"गोपीनाथ मुंडेंनी मराठा आरक्षणाला विरोध केला नाही, पण..."; पंकजा मुंडे दसरा मेळाव्यात स्पष्टच बोलल्या
3
Goldman Sachs चे 'हे' ४ शेअर्स बनले सुपरस्टार; एका वर्षात १५५ टक्क्यांपर्यंतची तेजी, तुम्ही घेतलाय का?
4
'आग तो लगी थी घर में...."; धनंजय मुंडेंनी शायरीतून भावना व्यक्त केली, मंत्रिपदाबाबत खंतही बोलून दाखवली
5
२ घास कमी खा पण स्वाभिमानाने राहा, कुणाचे तुकडे उचलू नका; पंकजा मुंडेंचं मेळाव्यात आवाहन
6
कराड आमचे दैवत...; पंकजा मुंडेंच्या दसरा मेळाव्यात झळकले वाल्मिक कराडचे पोस्टर
7
Gold Silver Price: सोन्या-चांदीच्या दरात विक्रमी वाढ; गुंतवणूकदारांनी मात्र टाळाव्यात 'या' ५ चुका
8
"खोटे धंदे करू नका, गुंड पाळू नका, काही गरज नाही", पंकजा मुंडे भगवान गडावर काय बोलल्या?
9
Jasprit Bumrah: जसप्रीत बुमराहचा मोठा पराक्रम, घरच्या मैदानावर 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
10
७५ वर्षांचा नवरा अन् ३५ वर्षांची नवरी! लग्नाच्या रात्रीच पतीचा मृत्यू; गूढ उलगडलं, समोर आलं सत्य
11
१९ वर्षे शनि, १८ वर्षे राहु महादशा: शनि महादशेत राहु अंतर्दशा आली? भाग्योदय; अपार पैसा-लाभ!
12
अभिनेता विजयला सोबत घेण्याचा भाजपाचा प्रयत्न; चेंगराचेंगरीच्या घटनेनंतर समोर आली नवीन रणनीती
13
Gensol Engineering Ltd: ₹२४०० वरुन ₹४१ वर आला 'हा' शेअर, आता ट्रेडिंग झालं बंद; संकटात कंपनी, तुमच्याकडे आहे का शेअर?
14
WhatsApp वापरकर्त्यांची प्रतीक्षा संपली! फक्त नंबर डायल करा आणि कॉल करा, नवीन फिचर आले
15
डोक्याला ताप! दिवसभर इन्स्टाग्रामवर रील बनवायची बायको; नवरा ओरडल्यावर मुलासह गायब
16
शुक्रवारपासून पंचक प्रारंभ: ५ दिवस अत्यंत प्रतिकूल, अशुभ; ‘या’ गोष्टी करूच नयेत, अमंगल काळ!
17
TATA Motors च्या गुंतवणूकदारांसाठी मोठी बातमी; डीमर्जरची तारीख आली समोर, एकावर १ शेअर मिळणार
18
अश्विन पाशांकुशा एकादशी २०२५: श्रीविष्णूंचे पद्मनाभ स्वरुप पूजन, ‘असे’ करा व्रत; शुभ-लाभ!
19
"बेबी, स्वीटी, तू माझ्यासोबत...!" विद्यार्थीनीसोबत एवढ्या घाणेरड्या गप्पा, समोर आलं चैतन्यानंदचं घृणास्पद चॅट
20
IMD: बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ धडकणार; ओडिशा किनारपट्टीला धोका!

शहरात एटीएम सेंटरमध्ये कोरोना संसर्गाचा धोका; बँकांचे दुर्लक्ष, गरजेला पैसे काढणे बेतू शकते जीवावर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 19, 2020 09:37 IST

शहरात विविध बँकांचे ४४३ एटीएम सेंटर आहेत. त्यापैकी बँकांना लागून असलेल्या सुमारे ५० एटीएम सेंटरमध्ये प्रवेशद्वारावर सॅनिटायझर ठेवण्यात आलेले आहे. त्या व्यतिरिक उर्वरित ३९३ सेंटरमध्ये पैसे काढणे कोरोनाला निमंत्रण देणारे ठरत आहे. (ATM)

सूर्यकांत वाघमारे 

नवी मुंबई  :बँकांच्या हलगर्जी शहरातील एटीएम सेंटर कोरोनाच्या प्रसाराला कारणीभूत ठरत आहेत. त्या ठिकाणी नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने कोणतीही उपाययोजना राबवली जात नसल्याचे दिसून आले आहे. नवी मुंबईत वाढता कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पालिकेकडून प्रयत्न सुरू आहेत, परंतु बँकांकडून पालिकेच्या प्रयत्नांवर पाणी पसरवले जात आहे. 

शहरात विविध बँकांचे ४४३ एटीएम सेंटर आहेत. त्यापैकी बँकांना लागून असलेल्या सुमारे ५० एटीएम सेंटरमध्ये प्रवेशद्वारावर सॅनिटायझर ठेवण्यात आलेले आहे. त्या व्यतिरिक उर्वरित ३९३ सेंटरमध्ये पैसे काढणे कोरोनाला निमंत्रण देणारे ठरत आहे. त्यात कन्टेनमेंट क्षेत्रातील एटीएम सेंटरचाही समावेश आहे. शासकीय व खासगी कार्यालयांसह नागरिकांची ये-जा असणाऱ्या इतरही महत्त्वाची ठिकाणे नियमित निर्जंतुकीकरण करण्याच्या सूचना पालिकेकडून होत आहेत, तर मिशन बिगीन अगेन अंतर्गत  व्यवसाय उद्योगांना अनुमती देतानाही खबरदारी घेण्याचे सांगण्यात येत आहे. यानंतरही एटीएमच्या माध्यमातून दिवसाला लाखो रुपयांची उलाढाल करणाऱ्या बँकांकडून १०० रुपयांचे सॅनिटायझर पुरविण्याकडे दुर्लक्ष होत आहे. 

बहुतांश बाधितांमध्ये लक्षणे दिसून येत नाहीत. अशा व्यक्तींकडून एटीएमचा वापर झाल्यास, दरवाजापासून ते मशीनच्या बटनापर्यंत अनेक ठिकाणी त्याचा स्पर्श होऊ शकतो. यामुळे त्या व्यक्तीनंतर त्या ठिकाणी येणाऱ्या अनेकांना मशीन हाताळताना कोरोनाचा संसर्ग पसरू शकतो, असेही तज्ज्ञांचे मत आहे. 

मशीनमुळे धोका -सेंटरमध्ये नियमित रोकड भरण्याचे काम वेगतवेगळ्या एजन्सीमार्फत केले जाते. या कामगारांकडून मशीन हाताळताना संसर्ग होऊ शकतो. त्यामुळे कामगारांकडून बँकांच्या उदासीनतेबाबत नाराजी व्यक्त होत आहे. 

साफसफाई रोज होते का?बहुतांश एटीएम सेंटरमध्ये ग्राहकांनी फाडून टाकलेल्या प्रिंटचा खच लागलेला पाहायला मिळत आहे. तर काही ठिकाणी बीन्स देखील नसल्याने हा कचरा सर्वत्र पसरत आहे. 

443 - शहरातील एकूण एटीएम50 - एटीएमवर सॅनिटायझरकिंवा हॅण्डवॉश उपलब्ध

बँकांना पुन्हा सूचना देणार कोरोनाला आळा घालण्यासाठी बँकांसह एटीएम सेंटरमध्ये नियमित सॅनिटायझरचा वापर होणे गरजेचे आहे. तशा प्रकारच्या सूचना यापूर्वीच दिल्या आहेत. यानंतरही एटीएम सेंटरमध्ये योग्य खबरदारी घेतली जात नसल्यास पुन्हा सर्व बँकांना सूचित केले जाईल.     - अभिजीत बांगर, आयुक्त, नवी मुंबई महापालिका  

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याatmएटीएमbankबँकNavi Mumbaiनवी मुंबई