बक्षिसांची रक्कम दुष्काळग्रस्तांना

By Admin | Updated: September 7, 2015 04:09 IST2015-09-07T04:09:57+5:302015-09-07T04:09:57+5:30

येथे अनेक ठिकाणी नेहमीप्रमाणे पारंपरिक पध्दतीने संस्कृतीनुसार व पोलिसांनी ठरवून दिलेल्या नियमात राहून बाळगोपाळांनी व युवकांनी

Rewards of drought | बक्षिसांची रक्कम दुष्काळग्रस्तांना

बक्षिसांची रक्कम दुष्काळग्रस्तांना

उरण : येथे अनेक ठिकाणी नेहमीप्रमाणे पारंपरिक पध्दतीने संस्कृतीनुसार व पोलिसांनी ठरवून दिलेल्या नियमात राहून बाळगोपाळांनी व युवकांनी मोठ्या जल्लोषाने व आनंदाने दहीहंडीचा आनंद लुटला. उरणमध्ये नगर परिषद हद्दीत कामठा, वाणीआळी, बाजारपेठ, कोटनाका, केगाव, नागाव, मोरा, बोरी, देऊळवाडी, विमला तलाव याठिकाणी तसेच खेडेगावातही हा सण उत्साहात साजरा झाला.
यंदाचे वैशिष्ट्य म्हणजे यावर्षी गोळा होणारी देणगी (सलामी) ही दुष्काळग्रस्तांसाठी वापरण्यात येणार आहे तर अनेक पथके पैशांचा सदुपयोग गणेशोत्सवाच्या कार्यक्रमासाठी करणार असल्याचे समजते. (प्रतिनिधी)

Web Title: Rewards of drought

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.