जलजीवन मिशनच्या कामात तक्रारींचा पाढा 

By वैभव गायकर | Updated: September 14, 2023 12:49 IST2023-09-14T12:49:39+5:302023-09-14T12:49:49+5:30

जल जीवन मिशन अंतर्गत सुरु असलेली कामे  आणि रखडलेल्या कामांचा आढावा घेण्यात आला.              

Review of grievances in Jaljeevan Mission work in panvel | जलजीवन मिशनच्या कामात तक्रारींचा पाढा 

जलजीवन मिशनच्या कामात तक्रारींचा पाढा 

नवेल :पनवेल उरण विधानसभा मतदार संघातील जल जीवन मिशन आढावा सभा दि.14 रोजी पनवेल येथील जेष्ठ नागरिक सभागृहात बैठक पार पडली.जल जीवन मिशन अंतर्गत सुरु असलेली कामे  आणि रखडलेल्या कामांचा आढावा घेण्यात आला.                                

साई,अजिवली,कसलखंड,गव्हाण,बारापाडा,पळस्पे,सांगुर्ली,बोर्ले या गावात रखडलेल्या कामांबाबत कंत्राटदारांना जाब विचारण्यास आला.या  रहिवाशांनी देखील मोठ्या प्रमाणात समस्यांचा पार वाचला.यावेळी आमदार प्रशांत ठाकुर ,आमदार महेश बालदी ,पंचायत समितीचे गटविकास अधिकारी संजय भोये आदींसह दोन्ही मतदार संघातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.अनेक वर्ष रखडलेल्या कामांबाबत देखील काही नागरिकांनी नाराजी व्यक्त केली.कामात कसुर करणाऱ्या कंत्राटदारांना टर्मिनेट करण्याची मागणी यावेळी महेश बालदी यांनी केली.
 

Web Title: Review of grievances in Jaljeevan Mission work in panvel

टॅग्स :panvelपनवेल