शहरं
Join us  
Trending Stories
1
Vanraj Andekar: वनराज आंदेकर टोळीने रक्तरंजित बदला घेतला; नाना पेठेत गोळीबार, आयुष कोमकरचा खून
2
भारत माफी मागेल, चर्चेच्या टेबलवर वाटाघाटीला येईल; डोनाल्ड ट्रम्प यांचे सचिव बरळले, धमकीही दिली
3
तंबाखू, सिगारेट अन्..., आणखी महागणार; केवळ ४०% जीएसटीच नव्हे, अतिरिक्त टॅक्सही लागणार?
4
अभिनेते आशिष वारंग यांचे आकस्मिक निधन; मराठी, बॉलिवूड चित्रपट सृष्टीवर शोककळा
5
टियागो ७५००० रुपये, नेक्सॉन, हॅरिअर, सफारी खूपच स्वस्त झाली; टाटाने जीएसटी कपातीचे दर जाहीर केले
6
Bhagwant Mann: पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांची प्रकृती बिघडली; हॉस्पिटलमध्ये भरती केले
7
"ब्राह्मण नफा कमावतायेत...!"; ट्रम्प यांच्या सल्लागाराच्या विधानावर भारताचा जोरदार पलटवार, दिलं असं उत्तर!
8
धक्कादायक! अफगाणिस्तानमधील भूकंपामध्ये महिलांना कोण वाचवत नाहीत, तालिबानच्या कायद्यांमुळे बचावकार्यात अडथळे
9
चीन की पाकिस्तान, भारतासाठी सर्वात मोठा धोका कोण? सीडीएस अनिल चौहान यांनी स्पष्ट सांगितले
10
यांचे काहीतरी वेगळेच...! Vivo, सॅमसंग नाही, पाकिस्तानात चालतो हा मोबाईल ब्रँड; ऐकलाही नसेल...
11
'आम्ही रशियाकडून तेल खरेदी करत राहू'; केंद्रीय अर्थमंत्र्याचे मोठे विधान
12
"माझा उद्देश हस्तक्षेप करण्याचा नव्हता, तर...", अजित पवारांनी सोडले मौन; IPS अंजली कृष्णा, व्हायरल व्हिडीओवर काय बोलले?
13
हुआवेचा आणखी एक ट्रिपल फोल्डेबल फोन लॉन्च; सॅमसंग, शाओमी, विवो, ओप्पोची उडाली झोप!
14
प्रसिद्ध फुटबॉलपटू नेमारही अज्ञात होता...! अनोळखी अब्जाधीश १० हजार कोटींची संपत्ती सोडून गेला
15
चांदीच चांदी...! वॅगनआरवर 84 हजार, नेक्सॉनवर 1.55 लाखांपर्यंत जीएसटी कमी होणार; अल्टो, 3XO किंमती पहाल तर...
16
जीएसटी कपातीमुळे सेकंड हँड कार डीलर्सची पळापळ; डिस्काऊंटवर डिस्काऊंट दिला तरी...
17
पीटर नवारोंच्या टीकेला भारताचे चोख प्रत्युत्तर; परराष्ट्र मंत्रालयाने सर्व दावे फेटाळले...
18
Maruti Victoris समोर टिकाव धरेल Grand Vitara? जाणून घ्या, फीचर्स अन् मायलेजच्या बाबतीत कोण सरस?
19
मधमाशांनी थांबवला खेळ! Live मॅचमध्ये फुटबॉलपटूंसह रेफ्री अन् कॅमरामॅनलाही करावी लागली कसरत (VIDEO)
20
चंद्र ग्रहण २०२५: ग्रहण काळात अन्न व साठवलेल्या पाण्यावर आठवणीने ठेवा तुळशीचे पान, कारण... 

नवी मुंबईचा निकाल ९३.७४ टक्के, मुलींनी मारली बाजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2018 02:35 IST

दहावीच्या परीक्षेमध्ये नवी मुंबईमधील ९३.७४ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. तब्बल ३,९२८ विद्यार्थ्यांनी विशेष प्रावीण्य मिळविले असून ३६ शाळांचा १०० टक्के निकाल लागला आहे.

नवी मुंबई : दहावीच्या परीक्षेमध्ये नवी मुंबईमधील ९३.७४ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. तब्बल ३,९२८ विद्यार्थ्यांनी विशेष प्रावीण्य मिळविले असून ३६ शाळांचा १०० टक्के निकाल लागला आहे. रायगड जिल्ह्यामध्ये ९२.४८ टक्के निकालासह पनवेल अव्वल स्थानी आहे. दोन्ही ठिकाणी मुलींनीच बाजी मारली आहे.नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रामधील १४० शाळांमधून १४,४०३ विद्यार्थी दहावी परीक्षेला बसले होते. यामधील १३,५०२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. उत्तीर्ण झालेल्यांमध्ये ९५.१४ टक्के मुली व ९२.५० टक्के मुलांचा समावेश आहे. मनपा क्षेत्रामधून तब्बल ३,०२८ विद्यार्थ्यांनी विशेष प्रावीण्य मिळविले आहे. ४५९५ विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. ३६ शाळांचा शंभर टक्के निकाल लागला आहे. याशिवाय तब्बल ६४ शाळांचा ९० ते ९९ टक्के निकाल लागला आहे. पनवेल तालुक्यातील विद्यार्थ्यांनीही लक्षणीय यश मिळविले आहे. ११४ शाळांमधून १०,४१९ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. यामधील ९,६३५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. रायगड जिल्ह्याचा निकाल ८९.३७ टक्के लागला असून सर्वाधिक ९२.४८ टक्के निकाल पनवेलचा लागला आहे. यामध्येही ९४.४८ टक्के निकाल मुलींचा आहे. पनवेल व नवी मुंबईमध्ये बारावीनंतर दहावीमध्येही मुलींनी चांगले गुण मिळविले आहेत.दहावीच्या निकालाकडे विद्यार्थी, पालक, शिक्षक व शाळा व्यवस्थापनाचेही लक्ष लागले होते. दुपारी १ वाजता संकेतस्थळावर निकाल जाहीर होताच सोशल मीडियावरून शुभेच्छांचा वर्षाव सुरू झाला. शाळा, गृहनिर्माण सोसायटींमध्ये यश मिळविलेल्या विद्यार्थ्यांनी व पालकांनी पेढे वाटून आनंद साजरा केल्याचे चित्र पाहावयास मिळत होते. अनेक विशेष मुलांनीही चांगले यश मिळविले.ईटीसी केंद्राचे यशमहापालिकेच्या ईटीसी अपंग शिक्षण व प्रशिक्षण केंद्राचा १०० टक्के निकाल लागला आहे. सलाह मुकादम या कर्णबधिर विद्यार्थ्याने ८० टक्के गुण मिळविले आहेत. प्रदीप चौधरी याने ७४ टक्के, सूर्या पणीकर याने ७९ टक्के गुण मिळविले आहेत. अध्ययन अक्षम दिव्यांग प्रवर्गातील केतन शर्मा या विद्यार्थ्याने ८५ टक्के गुण मिळविले आहेत. जिशान जेसानी याने ७४ टक्के गुण मिळविले असून विद्यार्थ्यांचे यश प्रेरणादायी असल्याची प्रतिक्रिया केंद्र संचालिका वर्षा भगत यांनी दिली आहे.४४ विद्यार्थ्यांनीपरीक्षा दिली नाहीनवी मुंबईमधून १४,४२२ विद्यार्थ्यांनी व पनवेलमधून १०,४४४ विद्यार्थ्यांनी अर्ज भरले होते. नवी मुंबईमधून १९ व पनवेलमधील २५ विद्यार्थ्यांनी परीक्षाच दिलेली नव्हती. नवी मुंबईमधील ९०१ व पनवेलमधील ७४८ विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले आहेत. अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांनी खचून जावू नये, असे आवाहन शिक्षकांसह तज्ज्ञांनी केले आहे.सायबर कॅफेमध्ये गर्दीपनवेलमध्ये निकाल पाहण्यासाठी १२ वाजल्यापासून अनेकांनी सायबर कॅफेमध्ये गर्दी केली होती. मोबाइलवर निकाल पाहताना वारंवार मोबाइल हॅक होत असल्यामुळे व नेटवर्कची समस्या असल्याने सायबर कॅफेमध्ये निकाल पाहण्यासाठी गर्दी केली होती. अनेकांनी निकालासाठी जादा मनुष्यबळ उपलब्ध केले होते.महापालिका शाळांचा ८९ टक्के निकालनवी मुंबई महानगरपालिकेच्या विद्यार्थ्यांनीही दहावीच्या निकालामध्ये लक्षणीय यश मिळविले आहे. नेरूळ शाळेतील वैष्णव कोंडाळकर याने ९४.६० टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक मिळविला आहे.करावेमधील रिश्वकुमार रवींद्र झा याने ९२.६०, कोपरखैरणे सेक्टर ७ मधील पूनम पांडुरंग शिंदे हिने ९०.८० टक्के गुण मिळविले आहेत.महापालिकेने मनपा शाळांमधील गुणवत्ता वाढीसाठी सुट्यांच्या कालावधीमध्ये जादा तासिका घेण्यात आल्या होत्या.याशिवाय महापालिकेने नववी व दहावीच्या विद्यार्थ्यांना मध्यान्ह भोजन योजनाही सुरू केली असल्यामुळे त्याचा लाभ झाला आहे.या सर्वांमुळे निकाल चांगला लागण्यास मदत झाली आहे. महापालिका आयुक्त रामास्वामी एन. यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.पालिका शाळांचा निकाल पुढीलप्रमाणेशाळा निकाल %दिघा १००दिवाळे १००सानपाडा ९५.४५वाशी ९५.३१शिरवणे ९४.२४घणसोली ९४.४नेरूळ ९३.२२कोपरखैरणे ९२.९८करावे ९२.८५ऐरोली ९०.१७तुर्भे गाव ८९.३९को.खै. सेक्टर ५ ८३.७७राबाडा ८३.३३खैरणे ८२.८९महापे ८१.१३तुर्भे स्टोअर्स ७५.९२श्रमिक नगर ७२

टॅग्स :Studentविद्यार्थी