रोजगार मेळाव्याला प्रतिसाद

By Admin | Updated: January 11, 2017 06:35 IST2017-01-11T06:35:04+5:302017-01-11T06:35:04+5:30

साईबाबा सेवा संस्था, साई प्रतिष्ठान कळंबोली व माध्यम प्रायोजक ‘लोकमत’ आयोजित रोजगार मेळाव्याला तरुणांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला

Responding to the Employment Meet | रोजगार मेळाव्याला प्रतिसाद

रोजगार मेळाव्याला प्रतिसाद

पनवेल : साईबाबा सेवा संस्था, साई प्रतिष्ठान कळंबोली व माध्यम प्रायोजक ‘लोकमत’ आयोजित रोजगार मेळाव्याला तरुणांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. नवीन सुधागड शाळेत रविवारी आयोजित या मेळाव्यात १५ कंपन्या सहभागी झाल्या होत्या. तर नोकरीच्या संधीसाठी ४७० मुले - मुलींनी अर्ज दाखल केले.
संस्थेचे अध्यक्ष नितीन काळे यांचे हस्ते दीप प्रज्वलन करून, मेळाव्याचे उद्घाटन करण्यात आले. या वेळी संदेश पाटील, विरेंद्र पाटील, गणेश कारंडे, किशोर जाट, केतन नाईक, धीरज पार्टे व हेमंत हिरे व सहकारी उपस्थित होते. मेळाव्यात पेण, खोपोली, बदलापूर व तळोजे येथील ४७० मुले-मुली सहभागी झाली होती.

Web Title: Responding to the Employment Meet