जिल्हा कार्यकारिणीचा राजीनामा
By Admin | Updated: February 20, 2015 00:06 IST2015-02-20T00:06:03+5:302015-02-20T00:06:03+5:30
सुडाचे राजकारण केले जात असल्याचा आरोप करीत मनविसेच्या सांस्कृतिक विभागाच्या संपूर्ण जिल्हा कार्यकारिणीतील पदाधिकाऱ्यांनी आपले राजीनामे सादर केले आहेत.

जिल्हा कार्यकारिणीचा राजीनामा
नवी मुंबई : मनसेच्या स्थानिक नेतृत्वाकडून गटबाजी आणि सुडाचे राजकारण केले जात असल्याचा आरोप करीत मनविसेच्या सांस्कृतिक विभागाच्या संपूर्ण जिल्हा कार्यकारिणीतील पदाधिकाऱ्यांनी आपले राजीनामे सादर केले आहेत. त्यामुळे महापालिका निवडणुकीच्या ऐन तोंडावर स्थानिक नेतृत्वाच्या कार्यपद्धतीविषयी शंका उपस्थित केल्या जात आहेत.
मनसेचे नवी मुंबई शहराध्यक्ष गजानन काळे यांच्या कार्यपद्धतीवर पक्षातून जोरदार टीका होत आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वी मनविसेचे शहराध्यक्ष शिरीष पाटील यांच्यासह मनसेचे माजी शहराध्यक्ष जितेंद्र कांबळी, कृष्णा पाटील आदींनी आपल्या समर्थकांसह सोडचिठ्ठी दिली होती. त्यांच्यापाठोपाठ आता मनविसे सांस्कृतिक विभागाचे ठाणे जिल्हाध्यक्ष अमर पाटील, शहराध्यक्ष गिरीराज दरेकर यांनीही आपल्या संपूर्ण कार्यकारिणीसह राजीनामे सादर केले आहेत. पाटील व दरेकर यांनी मनविसेचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आदित्य शिरोडकर यांना पत्र पाठवून आपल्या पदाचा व पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. मनसेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांकडून होणारे खच्चीकरण व सूडभावनेच्या राजकारणामुळे राजीनामा दिल्याचे पत्रात नमूद करण्यात आले आहे.
मनविसेच्या पदाधिकाऱ्यांनी संवाद न साधता राजीनामे सादर करणे योग्य नाही. तक्रारी असल्यास थेट संपर्क साधून चर्चा करावी. चर्चेतून मार्ग निघू शकतो, अशी प्रतिक्रिया मनसेचे शहराध्यक्ष गजानन काळे यांनी व्यक्त केली आहे. (प्रतिनिधी)
च्मनविसे सांस्कृतिक विभागाचे ठाणे जिल्हाध्यक्ष अमर पाटील, शहराध्यक्ष गिरीराज दरेकर यांनीही कार्यकारिणीसह राजीनामे सादर केले आहेत.
च्त्यामुळे पक्षातील अनागोंदी कारभार चव्हाट्यावर आला आहे.