भुयारी मार्गांचे स्थायीत पडसाद, पालिकेचे पैसे व्यर्थ गेल्याने नाराजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 15, 2019 01:45 AM2019-06-15T01:45:16+5:302019-06-15T01:45:31+5:30

प्रशासनाला धरले धारेवर : पालिकेचे पैसे व्यर्थ गेल्याने नाराजी

Residents of the subways, angry at the money of the poor | भुयारी मार्गांचे स्थायीत पडसाद, पालिकेचे पैसे व्यर्थ गेल्याने नाराजी

भुयारी मार्गांचे स्थायीत पडसाद, पालिकेचे पैसे व्यर्थ गेल्याने नाराजी

Next

नवी मुंबई : सायन-पनवेल महामार्गावरील नेरु ळ येथील चारही भुयारी मार्गांची दुरवस्था झाली असून, या भुयारी मार्गांचा गैरवापर होत असल्याची बातमी शुक्र वार, १४ जून रोजी ‘लोकमत’ने प्रसिद्ध केली होती. या बातमीचे पडसाद स्थायी समिती सभेत उमटले, तसेच बातमीच्या माध्यमातून समोर आलेल्या गांभीर्याची दखल घेत लोकप्रतिनिधींनी प्रशासनाला धारेवर धरले.

सायन-पनवेल महामार्गाच्या रुंदीकरणाच्यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाने अपघात टाळण्यासाठी नेरु ळ एलपी येथे २, नेरु ळ एसबीआय कॉलनी आणि उरण फाटा या ठिकाणी प्रत्येकी एक भुयारी मार्ग बनविला होता. भुयारी मार्गांचे काम अपूर्ण असल्याने भुयारी मार्गांची दुरवस्था झाली होती. या भुयारी मार्गांचा वापर व्हावा तसेच या भागात स्वच्छता राहावी यासाठी महापालिकेच्या माध्यमातून अर्धवट असलेल्या भुयारी मार्गांचे काम महापालिकेने सुमारे ४३ लाख रुपये खर्च करून पूर्ण केले होते.भुयारी मार्गात मोठ्या प्रमाणावर कचरा साचला असून सांडपाणी देखील साचले आहे. त्यामुळे नागरिकांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत असून नागरिकांच्या सुरक्षेचा मुद्दा देखील ऐरणीवर आला आहे.याबाबतचे वृत्त ‘लोकमत’ने प्रसिद्ध केले होते. पामबीच मार्गावरील भुयारी मार्गाचा प्रस्ताव स्थायी समिती सभेत चर्चेसाठी आल्यावर नगरसेविका सरोज पाटील यांनी ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीची दखल घेत प्रशासनाला धारेवर धरले. नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने भुयारी मार्गांजवळ सुरक्षारक्षक नेमण्याची मागणी केली.
शहर अभियंता सुरेंद्र पाटील यांनी यावर निवेदन करताना भुयारी मार्ग सार्वजनिक बांधकाम विभागाने बांधले असल्याचे सांगत त्याची देखभाल देखील त्या विभागाने करायची असल्याचे सांगितले. यावर सभागृह नेते रवींद्र इथापे यांनी प्रशासन चुकीची माहिती देत असल्याचा आरोप करीत भुयारी मार्गांच्या दुरु स्तीसाठी ५0 लाख रु पये खर्च केले मग नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने सुरक्षारक्षकांची नेमणूक करणे महापालिकेची जबाबदारी असल्याचे सांगितले. जर भुयारी मार्ग बंद ठेवायचे होते तर खर्च का केला, असा सवाल इथापे यांनी उपस्थित केला. नगरसेवक रंगनाथ औटी यांनी प्रशासन दिशाभूल करीत असून नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने प्रशासन काय करत आहे असा प्रश्न उपस्थित केला.

भुयारी मार्ग स्वच्छ करण्याचे सभापतींचे आदेश
च्नगरसेवक बहादूर बिष्ट यांनी नागरिकांच्या वापरासाठी खर्च केल्यावर नागरिकांना त्याचा वापर करता येत नसेल तर त्याचा काय उपयोग, भुयारी मार्गांच्या दुरवस्थेबाबत वर्तमानपत्रात बातमी येते त्यानंतर एखादी दुर्घटना घडण्याची प्रशासन वाट पाहत आहे का, असा सवाल उपस्थित केला.

च्अतिरिक्त आयुक्त रवींद्र पाटील यांनी याबाबत आयुक्तांशी चर्चा करून सुरक्षारक्षक नेमण्याबाबत निर्णय घेण्यात येणार असल्याचे सांगितले. सभापती नवीन गवते यांनी हा गंभीर प्रकार असल्याचे सांगत भुयारी मार्गाची स्वच्छता करून नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने सुरक्षारक्षक नेमावेत असे आदेश प्रशासनाला दिले.

Web Title: Residents of the subways, angry at the money of the poor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.