हेटवणेत आरक्षित पाणी पडून

By Admin | Updated: December 29, 2015 00:26 IST2015-12-29T00:26:15+5:302015-12-29T00:26:15+5:30

हेटवणे धरणात सिडकोचा आरक्षित पाण्यापैकी सुमारे १८ हजार एमएलडी पाणीसाठा शिल्लक राहत असल्याचे माहितीच्या अधिकाराखाली कळंबोली येथील आत्माराम पाटील यांनी उघड केले आहे.

Reserved water in Hetawat | हेटवणेत आरक्षित पाणी पडून

हेटवणेत आरक्षित पाणी पडून

पनवेल : हेटवणे धरणात सिडकोचा आरक्षित पाण्यापैकी सुमारे १८ हजार एमएलडी पाणीसाठा शिल्लक राहत असल्याचे माहितीच्या अधिकाराखाली कळंबोली येथील आत्माराम पाटील यांनी उघड केले आहे. मुबलक पाणी असूनही केवळ व्यवस्था नसल्याने सिडको वसाहतींना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. त्याचबरोबर पाण्यासाठी एमजेपी आणि नवी मुंबई महापालिकेवर अवलंबून राहावे लागत आहे.
नवीन पनवेल आणि खांदा वसाहतीत चार हजार ४० सदनिका आणि दोन हजार ६५० सोसायट्या आहेत. कळंबोलीत पाच हजार ९०० सदनिका आणि सुमारे ११५० सोसायट्या आहेत. या सर्व ग्राहकांना पाणीपुरवठा करण्याकरिता सिडको दररोज एमजेपीकडून ८५ एमएलडी पाण्याची गरज आहे. खारघर आणि कामोठे येथे सुमारे पाच हजारांच्या जवळपास ग्राहक असून, त्यांना ४०९ एमएलडी पाण्याची आवश्यकता आहे. याकरिता नवी मुंबई महापालिकेकडून ३८ एमएलडी पाणी घ्यावे लागते.
पेण परिसरात ८६.३५ कोटी खर्च करून पाटबंधारे विभागाने सिडकोच्या सहकाऱ्याने हेटवणे धरण बांधले. धरणाची पाणी साठवण्याची क्षमता १४७.४९ द.ल.घ.मी. इतकी आहे. त्यापैकी १४४.९८ द.ल.घ.मी. साठा उपयुक्त असून, १०० एमएलडी पाणी सिडकोला देण्याची अट ठेवण्यात आली होती. या वर्षी मार्चमध्ये या करारनाम्यात बदलून पाणीकोटा ५० ने वाढून १५० एमलडी करण्यात आला आहे. सिडकोने या ठिकाणाहून जलवाहिनी पूर्वीच टाकली असून, तिची क्षमता अतिशय कमी असल्याने आवश्यक पाणी सिडको वसाहतींना देतात येत नाही. त्याचबरोबर पंपिंगची क्षमतासुध्दा अतिशय कमी आहे. या कारणाने कमी दाबाने पाणी मिळते.

५४,७५० एमएलडी आरक्षित पाणी
हेटवणे प्रकल्प विभागाकडे मागितलेल्या माहितीनुसार सिडकोला दरवर्षी ५४,७५० इतके पाणी आरक्षित करण्यात आल्याची माहिती प्राप्त झाली आहे. त्यापैकी सिडको वर्षाला फक्त ३६,५०० एमएलडी पाणीच वापरीत असल्याचे उत्तरात नमूद करण्यात आले आहे. म्हणजे १८,२५० एमएलडी पाणी धरणात शिल्लक राहत असल्याचे माहिती अधिकारातून उघड झाले आहे.

सिडको वसाहतीला दररोज २१६ एमएलडी पाण्याची गरज आहे. एमजेपी आणि नवी मुंबई महानगरपालिका त्याचबरोबर हेटावणे धरणातून पाणी उचलून ते रहिवाशांना पुरवले जाते. आजूबाजूला ७९ गावांना सिडको पाणी देते. सध्या सुमारे 30 एमएलडी पाणी कमी पडते, ही वस्तुस्थिती आहे. त्याचबरोबर सध्या हेटावणे धरणातून आम्ही पाणी घेते, मात्र पंपिंग क्षमता कमी असल्याने अडचणी येतात. येत्या काही महिन्यांत सगळे कामे पूर्ण करून १५० एमएलडी पाणी या धरणातून घेण्यात येईल.
- रमेश गिरी, अधीक्षक अभियंता सिडको, पाणीपुरवठा विभाग

Web Title: Reserved water in Hetawat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.