१५२८ क्विंटल बियाणांचा साठा राखीव
By Admin | Updated: July 18, 2015 23:05 IST2015-07-18T23:05:03+5:302015-07-18T23:05:03+5:30
पाऊस लांबणीवर गेल्यामुळे भात लागवड शक्य झाली नसली तरी उपलब्ध रोपांद्वारे भाताची लागवड करणे सहज शक्य आहे. तरीही, आपत्कालीन परिस्थिती निर्माण होऊन दुबार पेरण्यांची

१५२८ क्विंटल बियाणांचा साठा राखीव
ठाणे : पाऊस लांबणीवर गेल्यामुळे भात लागवड शक्य झाली नसली तरी उपलब्ध रोपांद्वारे भाताची लागवड करणे सहज शक्य आहे. तरीही, आपत्कालीन परिस्थिती निर्माण होऊन दुबार पेरण्यांची गरज पूर्ण करण्यासाठी जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी १५२८ क्विंटल भात बियाण्यांचा साठा राखीव ठेवल्याचे ठाणे जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी डॉ. प्रफुल्ल बनसोडे यांनी लोकमतला सांगितले.
शक्यतो जिल्ह्यात दुबार पेरण्या करण्याची वेळ येण्याची शक्यता नाही. तरीदेखील, संभाव्य आपत्कालीन स्थितीवर मात करण्यासाठी भिवंडीजवळील महाबीज कंपनीच्या गोडाऊनमध्ये एक हजार ५२८ क्विंटल भात बियाण्यांचा साठा राखीव ठेवण्याचे नियोजन कृषी विभागाने केले आहे. शेतकऱ्यांना शासनाच्या दरासह ५० टक्के अनुदानावर या बियाण्यांची विक्री आपत्कालीन परिस्थितीत करण्याचे नियोजन करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. यंदा ६० हजार हेक्टर क्षेत्रावर भाताची लागवड करण्यात येणार आहे. त्यासाठी सुमारे पाच हजार ७०० हेक्टरवरील नर्सरीमध्ये भातरोपे तयार केली आहेत. (प्रतिनिधी)