त्या पोलिसांविरुद्ध गुन्हे दाखल करा!
By Admin | Updated: December 9, 2014 23:04 IST2014-12-09T23:04:53+5:302014-12-09T23:04:53+5:30
संपुर्ण तालुक्यात पोलीसांविरूद्ध संताप खदखदत असून त्याच्या निषेधार्थ आदीवासींनी येथील पोलीसठाण्यासमोर ठिय्या मांडला होता.

त्या पोलिसांविरुद्ध गुन्हे दाखल करा!
जव्हार : तालुक्यातील विनवळ येथील गावदैवताचे पुजारी यांनी पोलीसांच्या मारहाणीला व दहशतीला घाबरुन आत्महत्या प्रकरणाने संपुर्ण तालुक्यात पोलीसांविरूद्ध संताप खदखदत असून त्याच्या निषेधार्थ आदीवासींनी येथील पोलीसठाण्यासमोर ठिय्या मांडला होता. त्यामुळे जव्हार शहर व परिसराला पोलीस छावणीचे स्वरूप आले आहे. तसेच या प्रकरणामुळे पोलीसांच्या विनाकारण मारहाण, त्रस व दहशतीचे अनेक प्रकरणो आता उघड होवू लागली आहेत. विधीमंडळाचे अधिवेशन सुरू असल्याने मुख्यमंत्री ज्यांच्याकडेच गृहमंत्रीपदाची धुरा आहे ते पोलीसांच्या वाढत्या तक्रारीबाबत व विशेषत: जव्हारच्या दोषीपोलीसांवर काय कारवाई करणार? की पोलीसांनाच पाठीशी घालतात याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे.
गावदेवीचे पुजारी नवशा खुताडे यांचा मृतदेह 7 डिसेंला झाडाला गळफास लावलेल्या स्थितीत आढळला असला तरी परिस्थितीनुसार 8 ते 1क् दिवसापुर्वीच आत्महत्या केली असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत होता. या दुर्दैवी घटनेबाबत विनवळ तसेच परिसरातील नागरीकांकडे चौकशी केली असता पोलीसांच्या दहशतीच्या अनेक बाबी ग्रामस्थांनी सांगितल्या. दि. 28 ऑक्टो. रोजी बो:हाळे ग्रामपंचायत हद्दीत अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळून आला होता. तेव्हापासून जव्हार पोलीस आसपासच्या गावपाडय़ात जावून गोरगरीब आदिवासी जनतेला घरात घुसून बेदम मारहाण करत व अनोळखी मृत्यूची चौकशी करीत होते त्यांनी महेंद्र रघु दखणो यास 11 नोव्हें.ला रात्री 11 वा. तर दि. 12 नोव्हें. रोजी बेरात्री खुताडे यांना देखील घरातून उचलून नेले. पट्टय़ाने आणि लाथ्या, बुक्यांनी बेदम मारहाण क रून सोडून दिले. 28 नोव्हें.ला दु. 3 वा. नवशा खुताडे यांना त्यांच्या शेतावरील झोपडीत जाऊन बेदम मारहाण केली व जीप मध्ये टाकून नेले. सायंकाळच्या सुमारास त्यांना जामसर रस्त्यावर सोडून दिले व जाताना आम्ही पुन्हा येवू अशी धमकी दिली अशी माहिती मयताचा मुलगा यशवंत खुताडे याने दिली. त्यानंतर नवशा खुताडे पोलीस पुन्हा येतील व मारहाण करतील या भीतीने गायब झाले. मुले तसेच नातेवाईकांनी 8 दिवस त्यांचा सर्व ठिकाणी शोध घेतला परंतु शोध लागला नाही. 7 डिसें.ला जंगलातून उग्र वास येत असल्याने तपास केला असता नवशा खुताडे यांचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळला.
त्यानंतर शेकडोचा जमाव घटनास्थळी जमा झाला व पोलीसांच्या दहशतीला व मारहाणीला घाबरून नवशा यांनी आत्महत्या केली म्हणून जव्हार पोलीसस्टेशनला घेराव घातला व संतप्त जमावाने दोषी पोलीसांवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा करण्याची मागणी केली. पेालीसांनी वेळ मारून नेण्यासाठी मृतदेहाचे शवविच्छेदन मुंबई येथील जे. जे. हॉस्पिटल येथे नेले आणि 9 तारखेला मृतदेहाचे दफन देखील केले. (वार्ताहर)
काय घडले नेमके?
4दि. 12 नोव्हें. रोजी बेरात्री खुताडे यांना देखील घरातून नेले व बेदम मारहाण क रून सोडून दिले. 28 नोव्हें.ला दु. 3 वा. त्यांना त्यांच्या झोपडीत बेदम मारहाण केली व जीप मध्ये नेले. सायंकाळी त्यांना जामसर रस्त्यावर सोडले व आम्ही पुन्हा येवू अशी धमकी दिली