शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
2
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
3
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
4
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
5
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
6
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
7
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
8
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
9
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
10
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
11
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
12
iPhone 16: पहिल्यांदाच आयफोन १६ च्या खरेदीवर एवढी मोठी सूट!
13
भारत रशियाला युक्रेनविरुद्ध युद्धासाठी अप्रत्यक्षपणे निधी पुरवतोय, अमेरिकेचा आरोप!
14
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
15
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
16
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
17
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
18
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
19
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
20
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन

रिलायन्स हॉस्पिटलचे उदघाटन, 50 कोटी जनतेला मोठा दिलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 7, 2018 19:59 IST

ठाणे - प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतील आयुष्यमान भारत योजनेमुळे देशातील 50 कोटी जनतेला उपचारांवरील खर्चातून मोठा दिलासा मिळेल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले. रिलायन्ससारख्या रुग्णालयानेही सर्वसामान्य जनतेला उत्तम आणि आधुनिक सेवा देऊन या "मोदी केअर" मध्ये योगदान द्यावे, असे आवाहनही फडणवीस यांनी केले. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते नवी मुंबईतील कोपरखैरणे ...

ठाणे - प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतील आयुष्यमान भारत योजनेमुळे देशातील 50 कोटी जनतेला उपचारांवरील खर्चातून मोठा दिलासा मिळेल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले. रिलायन्ससारख्या रुग्णालयानेही सर्वसामान्य जनतेला उत्तम आणि आधुनिक सेवा देऊन या "मोदी केअर" मध्ये योगदान द्यावे, असे आवाहनही फडणवीस यांनी केले. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते नवी मुंबईतील कोपरखैरणे येथील रिलायन्स हॉस्पिटलचे उदघाटन त्यांच्या हस्ते झाले, त्यावेळी ते बोलत होते.

सरकार उच्च दर्जाच्या व परवडणाऱ्या सार्वजनिक आरोग्याच्या पायाभूत सुविधा पुरविण्यासाठी प्रयत्न करीत आहे. गेल्या काही वर्षांत देशभरातील निदान केंद्रे आणि सुविधांमध्ये लक्षणीय वाढ झाल्याने विविध रोगांविषयी माहिती होऊन त्यावरील उपचारही उपलब्ध होत आहेत. मुंबईत वैद्यकीय उपचारांसाठी इतर देशांतून रुग्ण येण्याचे प्रमाण वाढले आहे. परवडणारी आणि सहज उपलब्ध असणारी वैद्यकीय सेवा आवश्यक बाब असून हेल्थकेअर क्षेत्रात आणखीही मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक वाढणे गरजेचे आहे. त्यामुळे नोकरीच्या संधीही वाढतील, असे फडणवीस यांनी म्हटले. तसेच रिलायन्सच्या रुग्णालय सेवेचे कौतूक करताना, रिलायन्सच्या या हॉस्पिटलमध्ये जनरल वार्डसुद्धा इतक्या चांगल्या पद्धतीने सुसज्ज केला आहे की, तेथील रुग्णही हे वातावरण पाहून लवकरच बरा होईल, असे फडणवीस म्हणाले. या हॉस्पिटलमध्ये सर्वाना समान दर्जाच्या सेवा व उपचार मिळणार आहेत. त्यामुळे गरीब असो वा श्रीमंत सर्वांनाच एकसमान उपचारपद्धती मिळेल ही निश्चितच समाधानाची बाब आहे. रिलायन्सच्या या उपक्रमात राज्यातील अगदी छोट्या शहरांतही येणाऱ्या काळात 19 कॅन्सरवरील उपचार केंद्रे सुरू करण्यात येणार आहेत. कॅन्सरचे वाढते प्रमाण पहाता याची मोठी आवश्यकता आहे आणि या समूहाची ही मोठी झेप ठरेल असे फडणवीस यांनी शेवटी म्हटले. दरम्यान, उत्तरप्रदेशनंतर महाराष्ट्रात कॅन्सरचे प्रमाण सर्वाधिक असल्याची माहिती आहे. 

रिलायन्स हॉस्पिटलची वैशिष्टये

•    आंतरराष्ट्रीय दर्जाचे सुसज्ज •    अत्याधुनिक साधनसामुग्री•    संसर्ग होऊ नये म्हणून सुसज्ज रुम•    36 स्पेशल विभाग•    125 तज्ज्ञ डॉक्टर आणि 225 बेडस्•    4   आंतराष्ट्रीय  गुणवत्तेचे ऑपरेशन थिएटर•    रेडिएशन टेक्नोलॉजिसह अत्याधुनिक सुविधा 

टॅग्स :Relianceरिलायन्सDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसhospitalहॉस्पिटल