पुनर्वसन होणाऱ्या जागेची पाहणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2019 23:33 IST2019-01-15T23:32:52+5:302019-01-15T23:33:00+5:30
वाळवीग्रस्त गाव : जसखारमध्ये शासनाकडून हालचालींना वेग

पुनर्वसन होणाऱ्या जागेची पाहणी
उरण : मागील ३२ वर्षीपासून कोळीवाडा गावाच्या पुनर्वसनासाठी नव्याने उरण तालुक्यातील जसखार महसूल हद्दीतील जागा उपलब्ध करून देण्याच्या हालचाली शासनाने सुरू केल्या आहेत. रायगडचे जिल्हाधिकारी विजय सूर्यवंशी यांनी आमदार मनोहर भोईर, जेएनपीटी अधिकाºयांसह मंगळवारी जागेची फेरपाहणी केली.
वाळवीग्रस्त हनुमान कोळीवाडा गावाचे नियम आणि शासकीय मानकानुसार पुनर्वसन करण्यात आलेले नाही. उरण शहरातील बोरी-पाखाडी महसूल हद्दीत जेएनपीटीने हनुमान कोळीवाडा गावाचे पुनर्वसन केले आहे. मात्र, अपुºया जागेत झालेल्या पुनर्वसित सर्वच घरांना वाळवीने पोखरले आहे. आवश्यकतेनुसार १७ हेक्टर जागा आणि सोयी-सुविधा उपलब्ध करून त्या ठिकाणी पुनर्वसन करण्याची मागणी हनुमान कोळीवाडा ग्रामस्थांनी लावून धरली आहे.
गावाच्या पुनर्वसनासाठी आवश्यक असलेल्या जागेची ७ जानेवारी रोजी उपविभागीय अधिकारी दत्तात्रेय नवाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पाहणी करण्यात आली होती. मात्र, रात्रीच्या वेळी मोबाइलच्या उजेडात अधिकाºयांनी केलेल्या पाहणीमुळे नागरिकांनी टीका केली.
नागरिकांच्या टीकेची दखल घेत जिल्हाधिकारी विजय सूर्यवंशी यांनी आमदार मनोहर भोईर, अप्पर जिल्हाधिकारी भरत शितोळे, जेएनपीटीचे मुख्य अभियंता मदभावे, राजेश म्हात्रे, अधिकाºयांसह मंगळवारी जागेची पाहणी केली. उरण तहसीलदार कविता गोडे, हनुमान कोळीवाडा ग्रामस्थ, मंडळ अधिकारी, तलाठी आदी उपस्थित होते.