शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

गांभीर्य नसल्याने पुनर्विकास रखडला, मंदा म्हात्रे यांचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2020 00:18 IST

शहरातील धोकादायक इमारतींचा पुनर्विकास व्हावा, यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून शासन आणि महापालिकेकडे पाठपुरावा करत आहे.

नवी मुंबई : नवी मुंबई शहरातील अनेक इमारती मोडकळीस आल्या असून, धोकादायक स्थितीमध्ये आहेत. राज्य सरकार, महापालिका प्रशासन आणि सिडको यांना गांभीर्य नसल्याने गेल्या अनेक वर्षांपासून धोकादायक इमारतींचा पुनर्विकास रखडला असल्याचा आरोप आमदार मंदा म्हात्रे यांनी शुक्रवारी केला.नवी मुंबई महापालिकेने या वर्षी शहरातील सुमारे ४००हून अधिक इमारती धोकादायक असल्याचे घोषित केले आहे, परंतु शहरात मुंबईसारखी दुर्घटना घडल्यास, एखादी दुर्घटना किंवा नैसर्गिक आपत्ती आल्यास, महापालिकेने नागरिकांच्या राहण्याची व्यवस्था कोठे केली आहे? तसेच महापालिकेकडे संक्रमण शिबिरांची संख्या किती आहे? याबाबत विचारणा करण्यासाठी आमदार मंदा म्हात्रे यांनी महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांची शुक्रवारी भेट घेतली. त्यानंतर, आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत आमदार म्हात्रे बोलत होत्या.शहरातील धोकादायक इमारतींचा पुनर्विकास व्हावा, यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून शासन आणि महापालिकेकडे पाठपुरावा करत आहे. नागरिकांच्या या प्रश्नाबाबत कोणतेही सरकार, महापालिका आणि सिडकोला याचे गांभीर्य नसल्याचा आरोप म्हात्रे यांनी केला. शहरातील नागरिक महापालिकेला कर भरत असल्याने, त्यांना सुविधा पुरविण्याची नैतिक जबाबदारी महापालिकेची असल्याचे त्यांनी सांगितले. आयुक्त बांगर यांची नव्याने नियुक्ती झाली असून, त्यांना या समस्येबाबत माहिती देण्यात आली असून, संक्रमण शिबिरांचा प्रश्न तातडीने मार्गी लावण्याची सूचना केली आहे. पामबीच लागत असलेल्या मोकळ्या इमारतींमध्ये पाणी आणि लाइटची सुविधा उपलब्ध करून दिल्यास, त्या ठिकाणीही संक्रमण शिबिर सुरू करता येणार असल्याचे सूचित करण्यात आले असल्याचे म्हात्रे यांनी सांगितले. संक्रमण शिबिराच्या मुद्द्यावर येत्या आठ दिवसांत कार्यवाही न केल्यास, आक्रमक भूमिका घेण्याचा इशारा त्यांनी प्रशासनाला दिला. पत्रकार परिषदेला भाजपचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष रामचंद्र घरत, माजी नगरसेवक दीपक पवार, सुनील पाटील, महामंत्री विजय घाटे, भाजपचे युवा मोर्चाचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष दत्ता घंगाळे आदी उपस्थित होते.इमारतींचा पुनर्विकास हा कळीचा मुद्दा : नवी मुंबई शहरातील अनेक इमारती गेल्या अनेक वर्षांपासून धोकादायक स्थितीमध्ये आहेत. या इमारतींच्या पुनर्विकासासाठी शासन, महापालिकेकडे गेल्या अनेक वर्षांपासून पाठपुरावा करीत आहे. पुनर्विकासाची कामे कोणाला मिळतील, हा कळीचा मुद्दा बनला असून, यामुळेच पुनर्विकासाचा प्रश्न मार्गी लागला नसल्याची टीका आमदार मंदाताई म्हात्रे यांनी केली.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईManda Mhatreमंदा म्हात्रे