नवी मुंबईतील एपीएमसी फळ बाजारात हापूस आंब्याची विक्रमी आवक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2022 22:05 IST2022-05-03T18:01:02+5:302022-05-03T22:05:24+5:30
आंब्याच्या दरात देखील मोठी घसरण झाली.

नवी मुंबईतील एपीएमसी फळ बाजारात हापूस आंब्याची विक्रमी आवक
नवी मुंबई- साडे तीन मुहूर्तांपैकी एक समजला जाणाऱ्या अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर नवी मुंबईतील एपीएमसी फळ बाजारात हापूस आंब्याची विक्रमी आवक झाली आहे. यंदा आंब्याचा हंगाम उशिरा सुरू झाल्याने आता 15 एप्रिल ते 20 मे पर्यंत आंब्याचा हंगाम राहणार आहे.
आंब्याच्या दरात देखील मोठी घसरण झाली. एपीएमसी बाजारपेठेत 800 रुपये ते 2000 रुपये पेटी इतके दर आंब्याला भेटतायत. अक्षय तृतीयेचा सण असल्याने ग्राहकांनी देखील आंबे खरेदीसाठी मोठी गर्दी केली असून नागरिकांनी या हंगामात आंब्याचा आस्वाद घ्यावा असे आवाहन व्यापाऱ्यांमार्फत करण्यात येतेय.