शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

पनवेलच्या विकासाचा वास्तववादी संकल्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2018 07:01 IST

पनवेल महापालिकेचा वास्तववादी अर्थसंकल्प आयुक्तांनी स्थायी समितीमध्ये सादर केला. अशक्यप्राय अशा भव्य प्रकल्पांच्या घोषणा करण्याचे टाळले आहे. शहर स्वच्छतेला व पायाभूत सुविधेवर भर देण्यात आला आहे. अर्थसंकल्पावर स्थायी समितीमध्ये व सर्वसाधारण सभेमध्ये सर्वपक्षीय नगरसेवक काय भूमिका घेणार व त्यामध्ये अजून किती वाढ केली जाणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

- वैभव गायकरपनवेल  - पनवेल महापालिकेचा वास्तववादी अर्थसंकल्प आयुक्तांनी स्थायी समितीमध्ये सादर केला. अशक्यप्राय अशा भव्य प्रकल्पांच्या घोषणा करण्याचे टाळले आहे. शहर स्वच्छतेला व पायाभूत सुविधेवर भर देण्यात आला आहे. अर्थसंकल्पावर स्थायी समितीमध्ये व सर्वसाधारण सभेमध्ये सर्वपक्षीय नगरसेवक काय भूमिका घेणार व त्यामध्ये अजून किती वाढ केली जाणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.पनवेल महापालिकेची स्थापना झाल्यानंतर हा दुसरा अर्थसंकल्प. गतवर्षी निवडणुका असल्याने पालिकेचे वार्षिक अंदाजपत्रक प्रशासनाने तयार केले होते व नंतर त्याला सुधारित मान्यता घेण्यात आली होती. २०१८ - १९ वर्षासाठीचा अर्थसंकल्प खºया अर्थाने महत्त्वाचा ठरणार आहे. आयुक्त कोणत्या योजनांचा अर्थसंकल्पामध्ये समावेश करणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले होते. आयुक्तांनी खर्चीक प्रकल्पांपेक्षा पायाभूत सुविधांवर लक्ष दिले आहे. आरोग्य सुविधेची पायाभरणी करून नागरिकांना लवकरात लवकर सुविधा उपलब्ध करून देणे. घनकचरा व्यवस्थापन, साथीचे आजार, लसीकरण, श्वान व मूषक नियंत्रणा या सारख्या महत्त्वाच्या गोष्टींसाठीही तरतूद केली आहे. पनवेल हे पहिले झोपडपट्टीमुक्त शहर होवू शकते. शहरात झोपड्यांची संख्या कमी आहे. ती पुन्हा वाढू नये यासाठी झोपडपट्टी पुनर्वसन योजना राबविण्यासाठीही तरतूद केली आहे. पाणी ही शहरवासीयांसमोरील सर्वात गंभीर समस्या असणार आहे. यामुळे नवीन जलकुंभ बांधणे, पाणी विकत घेणे, धरणाची उंची वाढविणे यासाठीही मोठी तरतूद केली आहे. प्राथमिक शिक्षण मोफत व चांगल्या दर्जाचे देण्यावर भर देण्यात येणार आहे. पालिका शाळेतील विद्यार्थ्यांना संगणक शिक्षण देण्यात येणार आहे. ई लर्निंगसाठी स्वतंत्र तरतूद करण्यात आली आहे. महापालिकेच्या अर्थसंकल्पामध्ये गावठाणांचे सर्वेक्षण करण्यासाठी तरतूद केली असून गावठाणांमध्ये पायाभूत सुविधा पुरविण्यासाठीही विशेष तरतूद केली आहे. पूर्ण शहरात एलईडी पथदिवे बसविणे, सर्व प्रमुख बाजूला प्रवेशद्वारांची निर्मिती करण्यावरही लक्ष दिले आहे. आयुक्तांनी अर्थसंकल्प वास्तववादी असल्याचे स्पष्ट केले आहे. पालिकेसमोर खरे आव्हान प्रशासकीय यंत्रणा सक्षम करणे हेच असणार आहे. आरोग्य, शिक्षण, उद्यान, अभियांत्रिकी, परिवहन व इतर सर्व विभाग सक्षमपणे सुरू करण्याचे आव्हान पालिकेसमोर असणार आहे. प्रत्येक नोडमध्ये सर्व सुविधांनी युक्त विभाग कार्यालय, नागरी आरोग्य केंद्र, प्रत्येक प्रभागात शाळांसाठी परिश्रम घ्यावे लागणार आहेत.गावठाण विकासावर भरअर्थसंकल्पामध्ये गावठाण विकासासाठी स्वतंत्र तरतूद केली आहे. गावठाण परिसरातील पायाभूत सुविधांचे सर्वेक्षण करून, एकत्रित विकास आराखडा तयार करण्यासाठी दोन कोटी रुपये, गावठाण परिसरातील पायाभूत सुविधा पुरविण्यासाठी २४ कोटी रुपये इतर खर्चासाठी दीड कोटी रुपयांची तरतूद केली आहे. गावठाणांचे सर्वेक्षण केल्यामुळे विकासाच्या नक्की कोणत्या योजना राबविणे आवश्यक आहे, याविषयी नियोजन करणे शक्य होणार आहे.एलईडी दिव्यांनी उजळणार रस्तेशहरातील दिवाबत्तीच्या सुविधेसाठी तब्बल १५ कोटी ६० लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. रोडवर एलईडी पथदिवे बसविण्यात येणार आहेत. यासाठी पाच कोटी खर्च होणार आहेत. सोलार यंत्रणा बसविणे, हायमास्ट बसविणे, नवीन दिवे बसविणे, रोडवर नवीन खांब, भूमिगत सर्व्हिस लाइन टाकण्यासाठी भरीव तरतूद करण्यात आली आहे.पाणीपुरवठ्यासाठी २८ कोटीअर्थसंकल्पामध्ये पाणीपुरवठा योजनांसाठी तब्बल २८ कोटी रुपयांची तरतूद केली आहे. देहरंग धरणाची उंची वाढविणे, नवीन जलकुंभ उभारणे, देहरंग धरण परिसरामध्ये रेस्ट हाउसची उभारणी करणे, गाढेश्वर धरण पुरामुळे वाहून गेलेले पाइपलाइन टाकणे, धरण परिसराचे सुशोभीकरण करणे, आप्पासाहेब वेदक जलाशयातील गाळ काढणे, नवीन पाइपलाइनच्या व इतर कामांना प्राधान्य देण्यात आले आहे.मालमत्ता कर मुख्य स्रोतमहापालिकेने ५१६ कोटी रुपयांची तरतूद केली आहे. उत्पन्नाच्या प्रमुख स्रोतामध्ये मालमत्ता कर हा प्रमुख स्रोत असणार आहे. १०० कोटी रुपये या माध्यमातून मिळतील, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. वास्तविक मालमत्तांचे सर्वेक्षण केले व सर्व मालमत्ता सर्वेक्षणाच्या कक्षेत आणल्या तर मालमत्ता कराच्या माध्यमातून मिळणारे उत्पन्न अजून वाढणार आहे.शहर विकासाची महत्त्वाचीकामे व तरतूद (लाख)कामे तरतूदरोडचे काँक्रीटीकरण ५००रोडचे डांबरीकरण ५००नवीन रस्त ५००स्मशानभूमी ५००तलाव व सुशोभीकरण ५००कृष्णाळे व देवाळे तलाव २००पेव्हर ब्लॉक १००नवीन प्रशासकीय इमारत ५००विकास आराखडा व स्मार्ट सिटी ५५००बहुउद्देशीय सभागृह, समाज मंदिर १००वाहनतळ विकसित करणे १००रात्र निवारा केंद्र उभारणे ५०आंबेडकर भवन १०प्राथमिक शाळा इमारत २००नवीन बाजार विकसित करणे १००प्रवेशद्वार उभारणे २००१३ व १४व्या वित्त आयोगातून होणारी कामे (लाख)कामाचे स्वरूप खर्चनाट्यगृह बांधणे ५०दलित वस्ती सुधारणा २००देहरंग धरण उंची वाढविणे ०१अग्निशमन अभियानांतर्गत केंद्र ०१अमृत योजना ४७००विद्यार्थ्यांसाठी ई-लर्निंगशिक्षण व क्रीडा विभागासाठी नऊ कोटी ८० लाख रुपयांची तरतूद केली आहे. पालिका शाळेत शिक्षण घेणाºया विद्यार्थ्यांना ई-लर्निंग व संगणक शिक्षण देण्यासाठीही २५ लाख रुपयांची तरतूद केली आहे. विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी सहा लाख रुपयांची तरतूद केली आहे. विद्यार्थ्यांना गणवेश व इतर सुविधा देण्यात येणार आहेत. क्रीडा व सांस्कृती विभागासाठी तब्बल चार कोटी २५ लाखांची तरतूद केली आहे.सर्वांसाठी घर योजनापनवेल हे राज्यातील पहिले झोपडपट्टीमुक्त शहर होऊ शकते. इतर शहरांच्या तुलनेमध्ये झोपडपट्टीची संख्या कमी आहे. शहरामध्ये सर्वांसाठी घरे ही संकल्पना राबविण्यात येणार आहे. झोपडपट्टी पुनर्विकासासाठी एक कोटी ५० लाख रुपयांची तरतूद केली आहे. अर्थसंकल्पातील तरतूद कमी असली तरी यासाठी तरतूद केल्यामुळे ही योजना राबविण्यासाठी शासनस्तरावर पाठपुरावा करणे शक्य होणार आहे.वृक्षगणना करणारअर्थसंकल्पामध्ये वृक्ष संवर्धनासाठी एक कोटी ७५ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. यामध्ये पालिका क्षेत्रातील वृक्षगणना करण्यासाठी २५ लाख रुपये, अनावश्यक वृक्ष छाटणीसाठी ५० लाख, उद्यान दुरुस्तीसाठी २५ लाख वृक्ष संवर्धन व औषधी वनस्पतींचे प्रदर्शन भरविण्यासाठी ५० लाख रुपयांची तरतूद केली आहे. पर्यावरण रक्षणावरही भर दिला असून, त्यासाठी एक कोटी २० लाख रुपयांची तरतूद केली आहे.कुष्ठरुग्णांचीही घेतली काळजीसमाज विकास योजनांसाठी तीन कोटी ४५ लाख रुपयांची तरतूद केली आहे. शहरातील कुष्ठरुग्णांचीही दखल घेतली असून, त्यासाठीही दोन लाखांची तरतूद केली आहे. दिव्यांग मुलांसाठी केंद्र सुरू करण्यासाठी दोन कोटी रुपयांची तरतूद केली आहे.

टॅग्स :panvelपनवेल