शहरं
Join us  
Trending Stories
1
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
2
ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट...; आता जवानांना केवळ इंस्टाग्राम बघण्याचीच परवानगी
3
वैभव सूर्यवंशी पहिल्या सामन्यात बनला 'नंबर १'; रोहित शर्मा, विराट कोहलीला टाकलं मागे
4
Pune Crime: शेजारी राहणाऱ्या तरुणीसोबत प्रेमसंबंध, तिच्यासह नांदेडमधून पळाला; पण पुण्यात झाली हत्या
5
ठाकरे बंधू एकत्र आल्याचा जल्लोष केला अन् दुसऱ्याच दिवशी नाशिकमधील मनसे नेत्याचा राजीनामा
6
मिथुन राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? आधी संघर्ष, नंतर मोठे यश; 'जबाबदारी' ठरेल प्रगतीचा मूलमंत्र!
7
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
8
“याद राखा, मराठीचा अपमान केला तर ‘नहीं बटोगे... तो भी पिटोगे’”; मनसेने दिला थेट इशारा
9
हीच ती वेळ! शशी थरुर म्हणाले; सचिनसारखी प्रतिभा असलेल्या वैभव सूर्यवंशीला टीम इंडियात संधी द्या
10
राज्यातील ‘या’ वंदे भारत ट्रेनची वेळ बदलली! वेग वाढवला, लवकर पोहोचणार; प्रवाशांना मोठा लाभ
11
महाप्रलय टळला! स्वतःला अवतार म्हणणाऱ्या एबो नोहाचा नवा खळबळजनक दावा
12
एक चुकीची क्लिक अन् आयुष्यभराची कमाई स्वाहा! सायबर हॅकर्सचा नवा 'ConsentFix' अटॅक काय आहे?
13
एफडी विसरा, हायवेमध्ये करा गुंतवणूक! १०% पर्यंत मिळेल परतावा; 'राजमार्ग इनविट'ला सेबीची मंजुरी
14
सुरक्षा दलांची मोठी कारवाई; ओडिशातील गुम्मा जंगलात कुख्यात गणेश उइकेसह 4 माओवाद्यांचा खात्मा
15
'३ इडियट्स'च्या सीक्वलमधून शर्मन जोशीचा पत्ता कट?, अभिनेता म्हणाला- "मला तर..."
16
मी नाराज कधीच नव्हतो, भाजप हा माझा पक्ष; बाहेरून येणाऱ्या पाहुण्यांनी...- सुधीर मुनगंटीवार
17
ख्रिसमसच्या सकाळी PM नरेंद्र मोदींनी लावली ऐतिहासिक चर्चमध्ये हजेरी; प्रार्थनेत सहभागी
18
नाशिक भाजपात मोठा राडा! पक्षप्रवेशावरून २ गटांमध्ये तणाव; फरांदे समर्थकांकडून घोषणाबाजी
19
"आज 'महाप्रलय' येणार...!"; स्वतःला अवतार म्हणवणाऱ्या Eboh Noah च्या भविष्यवाणीला घाबरून एकत्र आले हजारो लोक
20
खळबळजनक रिपोर्ट! रशिया, भारत आणि फिलीपिन्स...कोणकोणत्या देशांच्या जमिनीवर चीनची करडी नजर?
Daily Top 2Weekly Top 5

पालिकेच्या तिजोरीवर उंदरांचा डल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2018 01:06 IST

भटकी कुत्री, डासांबरोबरच शहरवासी उंदरांमुळे त्रस्त झाले आहेत. मूषक नियंत्रणासाठी पालिकेच्या तिजोरीवरील ताणही वाढू लागला आहे.

नामदेव मोरे नवी मुंबई : भटकी कुत्री, डासांबरोबरच शहरवासी उंदरांमुळे त्रस्त झाले आहेत. मूषक नियंत्रणासाठी पालिकेच्या तिजोरीवरील ताणही वाढू लागला आहे. दहा वर्षांमध्ये सात कोटी ८१ लाख रुपये खर्च झाले असून २०१८-१९ या वर्षासाठी तब्बल दोन कोटी ८५ लाखांची तरतूद करण्यात आली आहे.घणसोली सेक्टर ७मधील सिंप्लॅक्स परिसरामध्ये काही दिवसांपूर्वी कार व दुचाकींची वायर उंदरांनी कुरतडली. अशाप्रकारच्या घटना वारंवार घडू लागल्या आहेत. रात्री सोसायटी आवारात उभी केलेली गाडी सकाळी सुरू झाली नाही की उंदरांनी वायर कुरतडल्या असणार, असा संवाद वारंवार ऐकू येऊ लागला आहे. शहरात गावठाण, झोपडपट्टी, बहुतांश सोसायटी आवारांत हीच स्थिती आहे. सानपाडा परिसरामधील एक कार्यालयामध्ये पाण्याच्या बॉटलपासून ते संगणकाच्या वायरपर्यंत अनेक महत्त्वाच्या वस्तू उंदरांनी कुरतडल्याच्या घटना घडल्या आहेत. स्वच्छ भारत अभियानामध्ये नवी मुंबईने आघाडी घेतली असली तरी उंदरांचा उपद्रव थांबविण्यामध्ये मात्र प्रशासनास अपयश आले आहे. पालिकेने मूषक नियंत्रणासाठी ठेकेदाराची नियुक्ती केली आहे. ठेकेदार बिळे बुझविणे, सापळे बसविणे व मूषक मारण्याचे काम करत आहेत; परंतु ठेकेदार योग्य पद्धतीने काम करत नसल्याच्या तक्रारी नागरिकांकडून होऊ लागल्या आहेत. प्रत्येक वर्षी मूषक नियंत्रणावरील खर्च वाढू लागला आहे.२००८ - ०९ या वर्षामध्ये पालिकेने १८ लाख ५८ हजार रुपये खर्च केले होते. दहा वर्षांमध्ये यामध्ये सहा पट वाढ झाली असून, २०१७-१८ या आर्थिक वर्षामध्ये यावर तब्बल एक कोटी ४६ लाख रुपये खर्च होत आहेत. प्रत्येक दिवशी उंदीर मारण्यावर तब्बल ४० हजार रुपये खर्च होऊ लागले आहेत. एवढा प्रचंड खर्च होऊनही शहरवासीयांची या त्रासातून सुटका होत नाही. मुळात उंदरांचा उपद्रव रोखण्यासाठी तक्रार कोणाकडे करायची, याची माहितीच नागरिकांना नाही. नगरसेवक प्रशासनाकडे व ठेकेदाराकडे पाठपुरावा करून मूषक नियंत्रणासाठीच्या उपाययोजना करण्यास सांगतात; परंतु त्यानंतरही प्रभावीपणे काम होत नाही. मूषक नियंत्रणाचे काम करणाºया ठेकेदारांची माहिती संकेत स्थळावरही देण्यात आलेली नाही.महापालिका प्रशासनाचेही ठेकेदाराच्या कामाकडे फारसे लक्ष नाही. तक्रारी करूनही त्याकडे लक्ष दिले जात नाही. रस्ते, पदपथ, इमारत बांधकाम, उद्यान व इतर कामांवर नागरिकांचे व माहिती अधिकार कार्यकर्त्यांचे आणि नगरसेवकांचेही लक्ष असते; पण मूषक नियंत्रणाच्या कामावर फारसे लक्ष दिले जात नसल्यामुळे ते काम प्रभावीपणे होत नसल्याचा आरोप नागरिक करू लागले आहेत. मूषक नियंत्रणावरील वाढत्या खर्चामुळे उंदीर तिजोरीवर डल्ला मारत असल्याच्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत.रोज ४० हजार खर्चमहापालिकेने २०१७-१८ या वर्षामध्ये मूषक नियंत्रणावर १ कोटी ४६ लाख रूपये खर्च होणार असल्याचे स्पष्ट केले असून, त्याविषयी अंदाज पत्रकामध्ये सुधारित तरतूद केली आहे. याचा अर्थ शहरामध्ये एका वर्षामध्ये मूषक नियंत्रणासाठी रोज ४० हजार रूपये खर्च महापालिकेला करावा लागत आहे. पालिकेच्या तिजोरीवरील भार प्रत्येक वर्षी वाढत आहे. पुढील आर्थिक वर्षासाठी तब्बल २ कोटी ८५ लाख रूपयांची तरतूद केली असून, एवढा खर्च झाला तर प्रतिदिन होणारा खर्च तब्बल ७८ लाखांवर जाणार आहे.

टॅग्स :Navi Mumbai Municipal Corporationनवी मुंबई महानगरपालिका