रत्नागिरी : जिल्ह्यात १ कोटी ६९ लाखांची हानी

By Admin | Updated: October 9, 2014 23:02 IST2014-10-09T22:29:11+5:302014-10-09T23:02:57+5:30

दरम्यान १७ व्यक्तिंचा विविध कारणांनी मृत्यू झाला तर आठ जनावरे दगावली.

Ratnagiri: A loss of Rs.1.66 crore in the district | रत्नागिरी : जिल्ह्यात १ कोटी ६९ लाखांची हानी

रत्नागिरी : जिल्ह्यात १ कोटी ६९ लाखांची हानी

रत्नागिरी : नैसर्गिक आपत्तीमुळे गेल्या चार महिन्यात जिल्ह्यात अनेक घरे, गोठे, सार्वजनिक मालमत्ता यांची मोठ्या प्रमाणावर हानी झाली. यात १ कोटी ६९ लाख रूपयांचे नुकसान झाले. यादरम्यान १७ व्यक्तिंचा विविध कारणांनी मृत्यू झाला तर आठ जनावरे दगावली. मात्र, पंचनामे अजूनही सुरू असल्याने नुकसानग्रस्तांना मदत मिळण्यात अनेक अडचणी येत आहेत. त्यात सध्या निवडणुकीचे काम सुरू असल्याने या नागरिकांना निवडणूक संपेपर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे.
जिल्ह्यात पूर्ण पडझड झालेल्या घरांचीे संख्या १९, अंशत: नुकसान झालेल्या घरांची संख्या ८०६, पूर्ण पडझड झालेल्या गोठ्यांची संख्या १८, तर अंशत: पडझड गोठ्यांची संख्या ८८ इतकी आहे. या सर्वांचे मिळून ९७ लाख ३१ हजार ४९९ रूपयांचे नुकसान झाले आहे. त्यापैकी केवळ ८१ घरे, गोठे यांना मदत देण्यात आली आहे.
तसेच या चार महिन्यांच्या कालावधीत ३१ सार्वजनिक मालमत्तांचे ५ लाख २१ हजार ४०० रूपयांचे, तर ४७ खासगी मालमत्तांचे ६ लाख ४१ हजार ७६१ रूपयांचे असे एकूण ६९ लाख ३२ हजार १६१ रूपयांचे नुकसान झाले आहे. यापैकी अद्याप कोणालाच मदत देण्यात आलेली नाही.या कालावधीत १७ व्यक्तिंचा मृत्यू झाला आहे. यात वीज पडून ३, पुरात वाहून गेलेले ३, दरड, भिंत पडून २ आणि अन्य कारणांनी ९ व्यक्तिंचा मृत्यू झाला आहे. यापैकी ६ मृतांच्या वारसांना प्रत्येकी दीड लाखप्रमाणे तत्काळ मदत देण्यात आली असून, १० प्रकरणे अपात्र ठरली आहेत. एक प्रकरण मदतीच्या अपेक्षेत आहे. या कालावधीत ८ जनावरे मृत झाली असून, १ लाख ९४ हजार ५०० रूपयांचे नुकसान झाले असून, जनावरांच्या मालकांना अद्यापही मदत देण्यात आलेली नाही. अजूनही पंचनामे होणे बाकी असल्याचे सांगण्यात आले. (प्रतिनिधी)

आपदग्रस्त घरे, गोठे, मृत्यु पावलेल्या व्यक्ती, जनावरे, नुकसान झालेली सार्वजनिक व खासगी मालमत्ता यांची तालुकानिहाय आकडेवारी
तालुकाघरेगोठेव्यक्तीजनावरेसार्वजनिक खासगी
मंडणगड४३०१००११०१
दापोली५६०८०0०८०६
खेड३९१३०२०१०३
गुहागर६११५०००२००
चिपळूण१२७१५०१२२०३
संगमेश्वर२५९१९०१३१०३०
रत्नागिरी८६१७०१०००३
लांजा८७१६०११३००
राजापूर६७०५०२१४०२
एकूण८२५१०६०८०८३१४७

Web Title: Ratnagiri: A loss of Rs.1.66 crore in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.