बलात्कारी पोलीस नाईक ओगल मुगले फरार

By Admin | Updated: January 24, 2015 22:53 IST2015-01-24T22:53:20+5:302015-01-24T22:53:20+5:30

लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर बलात्कार करुन फसवणूक केल्याप्रकरणी पालघरचे पोलीस नाईक रत्नाकर ओगलमुगले मागील सात दिवसापासुन फरार आहे.

Rapist police Naik Ogal Mughale absconded | बलात्कारी पोलीस नाईक ओगल मुगले फरार

बलात्कारी पोलीस नाईक ओगल मुगले फरार

पालघर : तारापुर मधील एका घटस्फोटीत महिलेला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर बलात्कार करुन फसवणूक केल्याप्रकरणी पालघरचे पोलीस नाईक रत्नाकर ओगलमुगले मागील सात दिवसापासुन फरार आहे. या फरार आरोपीला पालघरचे पोलीस अधिक्षक मोहमद सुवेझ हक यांनी निलंबीत केले आहे.
तारापुर जवळील सावराई या गावातील एक घटस्फोटीत महिला जेवणाचे डबे घरोघरी पोहचवून आपला उदरनिर्वाह चालविते. पालघर पोलीस अधिक्षक कार्यालयातील पोलीस नाईक ओगल मुगले यांनी त्या महिलेशी सलगी वाढवीली नंतर तिला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर अनेकवेळा बलात्कार केला. वेळोवेळी विवाहबाह्ण संबंध जबरदस्तीने ठेवल्याने त्या महिलला उपचारासाठी पालघरच्या ग्रामीण रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. पहिले दोन दिवस रूग्णालयात दाखल महिलेकडे ढुुंकुनही न पाहणाऱ्या आरोपीने पत्रकारांच्या हस्तक्षेपाने हे प्रकरण आपल्या अंगलट येत असल्याचे पाहिल्यानंतर या महिलेवर दडपण आणण्याचा प्रयत्न सुरू केला. याची माहिती पोलीस अधिक्षक मोहमद हक यांच्यापर्यंत पोहचल्यानंतर आरोपी ओगलमुगळे यांच्या विरोधात पोलीस स्टेशनमध्ये बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला.
याप्रकरणी आपल्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल झाल्याचे कळल्यानंतर आरोपी फरार असून न्यायालयात अटकपुर्व जामीनासाठी प्रयत्न करीत असल्याचे कळते. आपल्या उपस्थितीबाबत अनेक दिवसापासुन त्याने आपल्या कार्यालयाला कळविते नसल्याची माहिती पोलीसांनी दिली. त्यामुळे या प्रकरणातील गुन्हाचा प्रकार हा त्याचे फरार रहाणे इ. कारणास्तव त्याला सेवेतुन निलंबीत क रण्यात येत असल्याबद्दलची आॅर्डर निघाली आहे. आपण कामानिमित्त बाहेर असल्याने परत येताच निलंबनाच्या कागदपत्रावर सही करून आॅर्डर इश्यु करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस अधिक्षक हक यांनी लोकमतला दिली.
(वार्ताहर)

Web Title: Rapist police Naik Ogal Mughale absconded

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.