डेंग्यूसाठी शीघ्र कृती पथक

By Admin | Updated: November 9, 2014 01:48 IST2014-11-09T01:48:01+5:302014-11-09T01:48:01+5:30

डेंग्यू निवारणासाठी जिल्ह्यात ‘रॅपिड रिस्पॉन्स टीम’ची (आरआरटी) निर्मिती करण्यात आली आहे.

Rapid Action Squad for Dengue | डेंग्यूसाठी शीघ्र कृती पथक

डेंग्यूसाठी शीघ्र कृती पथक

जितेंद्र कालेकर - ठाणो
डेंग्यू निवारणासाठी जिल्ह्यात ‘रॅपिड रिस्पॉन्स टीम’ची (आरआरटी) निर्मिती करण्यात आली आहे. यामध्ये हिवताप अधिकारी, निवासी वैद्यकीय अधिकारी, पॅथोलॉजिस्ट, मायक्रो पॅथोलॉजिस्ट आणि अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी यांचा समावेश आहे. ज्या भागांत तापाचे रुग्ण मोठय़ा प्रमाणात आढळतील, तिथे आरआरटी संशोधन करेल आणि आवश्यक उपाय योजण्यात येतील.
ठाणो, रायगड आणि पालघर या तीन जिल्ह्यांसाठी डेंग्यूच्या रक्त तपासणीसाठी मध्यवर्ती प्रयोगशाळा ठाणो जिल्हा विठ्ठल सायन्ना शासकीय रुग्णालयात सुरू केल्याची माहिती अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. रघुनाथ राठोड यांनी दिली. डेंग्यू होण्यापूर्वीच जिल्ह्यात विविध प्रकारे प्रतिबंधात्मक उपाय केल्याचा दावा आरोग्य विभागाने केला आहे. डेंग्यूचे रुग्ण मोठय़ा प्रमाणात आढळल्यानंतर ठाण्याच्या जिल्हा शासकीय  रुग्णालयात पाच खाटांचा कक्षही निर्माण करण्यात आला असून एलायझाद्वारे डेंग्यूची तपासणीही करण्यात येत असल्याची माहिती त्यांनी दिली.  जिल्हास्तरावरील आरआरटी टीमप्रमाणो तालुकास्तरावरही अशाच टीम कार्यरत करण्यात आल्या आहेत.
डेंग्यूची अंडी वाढू न देण्याच्या दृष्टीने अबेटच्या औषधांचा पाण्यावर मारा करणो तसेच तलावांमध्ये गप्पी मासे पाळणो आदी प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात येत असल्याचे कोकण विभागाचे आरोग्य उपसंचालक डॉ. संजीव कांबळे यांनी सांगितले.
याशिवाय, स्वच्छ भारत अभियानांतर्गत ठाणो शहर आणि जिल्हाभर ठिकठिकाणी स्वच्छता अभियान राबविण्यात येत आहे. ठाण्याचे महापौर संजय मोरे यांनीही पुढाकार घेऊन ही स्वच्छता मोहीम शहरभर राबविण्यास  सुरुवात केली. आता हाच उपक्रम सर्वच महापालिका आणि नगरपालिकांमध्ये राबविण्यात येत आहे.
 
महिनाभरात जिल्ह्यातील शहरी भागांत डेंग्यूचे 144 तर ग्रामीण भागांत आठ रुग्ण आढळले आहेत. ठाणो महापालिकेच्या क्षेत्रत सर्वाधिक म्हणजे 93, त्यापाठोपाठ वसई-विरार 25, मीरा-भाईंदर 11, कल्याण-डोंबिवली 5 आणि भिवंडीमध्ये चार, नगर परिषदेच्या परिसरात 3 आणि ग्रामीण भागांत 5 रुग्ण आढळले आहेत. ठाण्याच्या कोपरी आणि मीरा-भाईंदर परिसरांत डेंग्यूची लागण मोठय़ा प्रमाणात झाल्याचे आढळले आहे. ज्या भागांत कच:याचे अधिक प्रमाण आहे, तसेच नवीन बांधकाम सुरू आहे, तिथे परिसरात डेंग्यूच्या अळ्यांची वाढ मोठय़ा प्रमाणात होत आहे. 
 
वर्षभरात 37क् रुग्ण : डेंग्यूचे वर्षभरात 37क् रुग्ण आढळले असून त्यात तिघांचा मृत्यू झाला आहे. जानेवारी 2क्14 पासून आतार्पयत ठाणो जिल्ह्यात डेंग्यूने एकाचा मृत्यू झाला. 
राज्यभरात सतर्कता.. 
राज्याच्या आरोग्य विभागाने शुक्रवारी राज्यस्तरावर जिल्हा शल्यचिकित्सकांची व्हिडीओ कॉन्फरन्स घेतली. खबरदारी घेण्याचे आवाहन आरोग्य संचालक डॉ. सतीश पवार यांनी केले. तापाच्या कोणत्याही रुग्णाबाबत हलगर्जीपणा न करण्याचे निर्देश देण्यात आले.

 

Web Title: Rapid Action Squad for Dengue

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.