शहरं
Join us  
Trending Stories
1
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
2
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
3
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
4
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
5
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
6
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
7
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
8
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
9
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
10
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
11
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
12
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
13
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
14
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
15
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
16
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
17
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
18
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
19
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
20
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

Crime News: स्वतःच्या 3 वर्षीय मुलीची हत्या करुन पुरला मृतदेह, आरोपी पित्याला पोलिसांनी घेतले ताब्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2022 22:12 IST

रॅपिड ऍक्शन फोर्सच्या जवानाने घरगुती भांडणातून स्वतःच्या तीन वर्षीय मुलीची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

नवी मुंबई : रॅपिड ऍक्शन फोर्सच्या जवानाने घरगुती भांडणातून पत्नी व मुलीला केलेल्या मारहाणीत तीन वर्षीय मुलीच्या मृत्यूची घटना घडली आहे. मारहाणीत चिमुकलीचा मृत्यू झाल्यानंतर त्याने मृतदेह परिसरातल्या डेब्रिजच्या भरावामध्ये पुरला होता. मात्र हा मृतदेह पोलिसांच्या हाती लागला आणि काही तासातच खारघर पोलिसांनी गुन्हा उघडकीस आणला आहे. याप्रकरणी आरोपी पित्यास अटक करण्यात आली आहे.

सविस्तर माहिती अशी की, तळोजा येथील तलावालगतच्या डेब्रिजमध्ये मंगळवारी सकाळी एका तीन वर्षीय मुलीचा मृतदेह आढळून आला होता. लुंगीत गुंडाळलेला हा मृतदेह त्याठिकाणी पुरण्याचा प्रयत्न झाला होता. मात्र त्याठिकाणी एक मृतदेह असल्याची माहिती अन्वर पटेल यांनी पोलिसांना दिली. त्यानुसार खारघर पोलिसांचे पथक दाखल झाले आणि त्यांनी मृतदेह ताब्यात घेऊन शविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला.

आरोपीचा पाठलाग करुन ताब्यात घेतले

तिकडे, मुलीच्या फोटोवरुन तिच्या नातेवाईकांचा शोध घेतला जात होता. त्याचदरम्यान उपनिरीक्षक शिरीष यादव यांच्या पथकाला ती मुलगी पापडी पाडा गावातील रॅपिड ऍक्शन फोर्सच्या जवानाची असल्याचे समजले. त्यानुसार वरिष्ठ निरीक्षक संदीपान शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पथक त्याठिकाणी गेले असता, आरएएफच्या गणवेशातील एक व्यक्ती पळून जाताना दिसली. यामुळे पोलिसांनी पाठलाग करून त्याला ताब्यात घेतले.

असा झाला चिमुकलीचा मृत्यू

सुरवातीला आरोपीने उडवाउडवीची उत्तरे दिली, पण नंतर त्याने आपल्याच हातून मुलीची हत्या झाल्याची कबुली दिली. त्यानुसार परशुराम तिपन्ना (३९) याच्या विरोधात गुन्हा दाखल करुन त्याला अटक करण्यात आली आहे. चौकशीत त्यांने सांगितले की, सोमवारी रात्री त्याचे पत्नी भाग्यश्रीसोबत भांडण झाले होते. या भांडणात त्याने पत्नी व मुलगी मीनाक्षी (३) यांना मारहाण केली. दरम्यान मुलगीला उचलून आपटल्याने डोक्यावर गंभीर दुखापत होऊन ती जागीच मृत पावली. यानंतर त्याने मंगळवारी पहाटेच्या सुमारास मुलीचा मृतदेह तळोजा तलावालगत डेब्रिजच्या भरावामध्ये नेवून त्याठिकाणी पुरण्याची प्रयत्न केल्याची कबुली दिली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीNavi Mumbaiनवी मुंबईPoliceपोलिस