खंडणीप्रकरणी तोतया पत्रकार अटकेत

By Admin | Updated: September 12, 2015 23:36 IST2015-09-12T23:36:39+5:302015-09-12T23:36:39+5:30

तुर्भे येथील मटण विक्रेत्याला खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची भीती दाखवून खंडणी मागणाऱ्या दोघांना एपीएमसी पोलिसांनी अटक केली आहे. दोघेही स्वत:ला पत्रकार सांगत असून

In the ransom case, the detained journalist was arrested | खंडणीप्रकरणी तोतया पत्रकार अटकेत

खंडणीप्रकरणी तोतया पत्रकार अटकेत

नवी मुंबई : तुर्भे येथील मटण विक्रेत्याला खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची भीती दाखवून खंडणी मागणाऱ्या दोघांना एपीएमसी पोलिसांनी अटक केली आहे. दोघेही स्वत:ला पत्रकार सांगत असून त्यांच्यावर यापूर्वीही गुन्हे दाखल आहेत. तुर्भे येथील मटण विक्रेते शब्बीर पठाण यांनी ३ सप्टेंबर रोजी सांगली येथून म्हशीचे मांस मागवले होते. यानुसार पहाटे २ वाजण्याच्या सुमारास मांस घेऊन आलेली जीप मॅफ्को मार्केटलगत उभी होती. यावेळी तिथे आलेल्या दोघांनी जीपचे चालक व क्लीनरकडे मटणासंबंधीची चौकशी केली. चालकाने दिलेली फाडून त्याच्याकडून ५ हजार रुपयांची रोख रक्कमही काढून घेतली. तसेच कारवाईपासून वाचण्यासाठी त्यांनी मटण विक्रेते पठाण यांच्याकडे १ लाख रुपये खंडणीची मागितले. याप्रकरणी पठाण यांनी दिलेल्या तक्ररीवरून पोलिसांनी गुरुपाल सिंग व सुशील सोयी या दोघा तोतया पत्रकारांना अटक केली आहे. दरम्यान, त्यांनी इतरही मटण व्यावसायिकांना धमकावून खंडणी उकळ्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे. (प्रतिनिधी)

Web Title: In the ransom case, the detained journalist was arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.