रामदास शेवाळेंचा भाजपा प्रवेश निश्चित

By Admin | Updated: April 17, 2017 04:28 IST2017-04-17T04:28:10+5:302017-04-17T04:28:10+5:30

राष्ट्रवादीतील राजकारणाला कंटाळलेल्या रामदास शेवाळे यांचा भाजपामधील प्रवेश निश्चित झाला आहे. मंगळवार, १८ एप्रिल रोजी ते हजारो

Ramdas Shewale's BJP admission | रामदास शेवाळेंचा भाजपा प्रवेश निश्चित

रामदास शेवाळेंचा भाजपा प्रवेश निश्चित

तळोजा : राष्ट्रवादीतील राजकारणाला कंटाळलेल्या रामदास शेवाळे यांचा भाजपामधील प्रवेश निश्चित झाला आहे. मंगळवार, १८ एप्रिल रोजी ते हजारो कार्यकर्त्यांसह भाजपात प्रवेश करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. शेवाळे यांच्या निर्णयामुळे महाआघाडीला फटका बसणार, हे निश्चित आहे.
सर्वसामान्यांचे प्रश्न व त्यांच्या समस्या सोडवण्याचे आश्वासन भाजपाकडून देण्यात आले आहे. तसेच देशाच्या विकासासाठी भाजपाकडून राबविण्यात येणारे उपक्रम कौतुकास्पद आणि कामासाठी प्रोत्साहन देणारे असल्याने शेवाळे यांनी भाजपात जाण्याचा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे.
रामदास शेवाळे यांना कळंबोली येथून ३ ते ४ जागा लढवण्याची, तसेच भाजपामध्येही महत्त्वाची जबाबदारी देण्यात येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व रामशेठ ठाकूर यांच्या नेतृत्त्वावर विश्वास ठेवून शेवाळेंनी भाजपा प्रवेशाचा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे. (वार्ताहर)

Web Title: Ramdas Shewale's BJP admission