शहरं
Join us  
Trending Stories
1
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
2
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
3
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
4
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
5
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
6
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
7
बीडमध्ये कोळवाडीजवळ थरार! भरधाव डिझेल टँकरने रस्त्यावर घेतला पेट; प्रवाशांमध्ये दहशत
8
मंगळ ग्रह गायब झाला तर पृथ्वीचं काय होणार? संशोधनातून धक्कादायक माहिती आली समोर  
9
"गुलामाने प्रतिक्रिया द्यायची नसते हे त्यांना सांगा"; अधिवेशनात उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर घणाघात
10
विरोधी पक्षनेतेपदाबाबत उद्धव ठाकरे आक्रमक, सरकारची कोंडी करण्याची तयारी; स्पष्ट इशाराच दिला
11
“अधिवेशानाचे सत्ताधाऱ्यांना गांभीर्य नाही, ‘हम करे सो कायदा’ पद्धतीने…”: हर्षवर्धन सपकाळ
12
“संसदीय लोकशाहीत विविध पक्षांच्या संघटनेचे योगदान देखील महत्त्वाचे”: मंत्री चंद्रकांत पाटील
13
“बाबा आणि आत्याने आईला खूप मारलं'”; ढसाढसा रडत ४ वर्षांच्या लेकाचा धक्कादायक खुलासा
14
अक्षय खन्नाला आहेत दोन भाऊ, एक सख्खा अन् एक सावत्र, दोघांनीही बॉलिवूडमध्ये केलं काम
15
विराट कोहली, रोहित शर्माला कपिल देव यांचा अजब सल्ला, म्हणाले- "मला वाटतं की टीम इंडियात..."
16
कॅमेरा नसलेला 'आयफोन' बाजारात? खरेच असा फोन अस्तित्वात आहे का? ॲप्पलच बनविते...
17
या ठिकाणी अचानक पडले ७०० मोठे खड्डे, जमिनीत गाडला जातोय संपूर्ण परिसर, कारण काय?
18
“साधूसंत झाडावर राहणार का? एक दिवस लोक सरकारला ‘चले जाव’ म्हणतील”; अण्णा हजारे संतापले
19
मैत्रिणींचा सोनमला वाचवण्याचा प्रयत्न? राजा रघुवंशीच्या भावाचा खळबळजनक आरोप
20
टाटा-हिंडाल्कोसह 'या' शेअर्समध्ये बंपर तेजी! बाजारात सलग दुसऱ्या दिवशी गुंतवणूकदारांची चांदी
Daily Top 2Weekly Top 5

नवी मुंबईलाही पावसाने झोडपले; जनजीवन विस्कळीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2019 23:53 IST

महापालिका कार्यक्षेत्रामध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे. दोन दिवसांत तब्बल २२ वृक्ष कोसळले असून, तीन ठिकाणी संरक्षण भिंत कोसळली आहे. शनिवारी पहाटेपासून पाऊस वाढल्याने सकाळच्या सत्रातील शाळांना सुट्टी देण्यात आली होती.

नवी मुंबई : महापालिका कार्यक्षेत्रामध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे. दोन दिवसांत तब्बल २२ वृक्ष कोसळले असून, तीन ठिकाणी संरक्षण भिंत कोसळली आहे. शनिवारी पहाटेपासून पाऊस वाढल्याने सकाळच्या सत्रातील शाळांना सुट्टी देण्यात आली होती.नवी मुंबईमध्ये २६ जुलैला २४ तासामध्ये तब्बल सरासरी २२१ मिमी. एवढी पावसाची नोंद झाली आहे. शनिवारी सायंकाळी साडेचार वाजेपर्यंत ७८ मिमी. पावसाची नोंद झाली होती. एकाच दिवशी १५ वृक्ष कोसळले. शनिवारीही शहरवासीयांना पाऊसाने झोडपले. यामुळे हजारो नागरिकांना नोकरी व व्यवसायाच्या ठिकाणी पोहोचता आले नाही. सायंकाळपर्यंत वाशीमध्ये २ व सीबीडीमध्ये ४ वृक्ष कोसळले. नेरूळ सेक्टर ११ मध्ये संरक्षण भिंत कोसळली असून, दोन दिवसांतील ही तिसरी घटना आहे. सुरक्षेची उपाययोजना म्हणून शाळांना सुट्टी देण्यात आली होती, परंतु सुट्टीची माहिती न मिळाल्यामुळे अनेक विभागामध्ये शाळा सुरूच ठेवण्यात आल्या होत्या.जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये नवी मुंबईमध्ये ३३ ठिकाणी पाणी साचले होते. यामुळे महापालिका प्रशासनावर चौफेर टीका झाली होती. यानंतर, प्रशासनाने पाणी साचणाऱ्या ठिकाणी आवश्यक कामे केल्यामुळे दोन दिवसांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी कुठेच साचले नाही.मुसळधार पाऊस सुरू असूनही मुंबई कृषी उत्पन्न बाजारसमितीमधील व्यवहार सुरळीत होते. भाजी व फळ मार्केटच्या प्रवेशद्वारावर काही प्रमाणात पाणी साचले होते, पण त्याचा खरेदी-विक्रीवर फारसा परिणाम झालेला नाही. भाजी मार्केटमध्ये १०० ट्रक व ४४३ टेम्पो अशी एकूण ५४३ वाहनांची आवक झाली असून, ५६२ वाहनांमधील भाजीपाला मुंबई व नवी मुंबईमधील किरकोळ मार्केटमध्ये वितरित झाला आहे. दिवसभर सर्व व्यवहार सुरळीत होते, अशी माहिती बाजारसमिती अधिकाऱ्यांनी दिली.उरणमध्ये मुसळधार पाऊसमुसळधार पावसामुळे उरण येथील बोकडवीरा गावातील रहिवाशाच्या घराचे मोठे नुकसान झाले. जयवंत रोहिदास डाकी यांच्या घराचे पत्रे उडून नुकसान झाले आहे. केगाव येथे झाड कोसळल्याने त्या ठिकाणच्या काही घरातील वीज पुरवठा खंडित झाला आहे. रांजणपाडा येथील गावात पावसाचे पाणी शिरले असल्याची माहिती तहसीलदार कल्पना गोडे यांनी दिली. जोरदार पावसामुळे मोरा भाऊचा धक्का दरम्यानची सागरी प्रवासी वाहतूकही संध्याकाळनंतर बंद करण्यात आली होती.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई