फेरीवाल्यांनी बळकावला रेल्वेचा पादचारी पूल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2019 01:25 AM2019-06-17T01:25:41+5:302019-06-17T01:25:51+5:30

तुर्भेतील प्रकार; आठवड्यापूर्वी झाले उद्घाटन

Rail pedestrian bridge constructed by hawkers | फेरीवाल्यांनी बळकावला रेल्वेचा पादचारी पूल

फेरीवाल्यांनी बळकावला रेल्वेचा पादचारी पूल

googlenewsNext

नवी मुंबई : रेल्वेरूळ ओलांडण्याच्या प्रयत्नात घडणाऱ्या अपघातांना आळा घालण्यासाठी तुर्भेत उभारण्यात आलेला पादचारी पूल आठवड्यातच अतिक्रमणाच्या विळख्यात सापडला आहे. पादचाऱ्यांच्या सोयीसाठी बनवलेल्या या पुलावर रविवारचा आठवडे बाजार बसल्याचे चित्र दिसून आले. त्यामुळे हा पूल पादचाºयांच्या की फेरीवाल्यांच्या सोयीसाठी, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

तुर्भे नाका व जनता मार्केट परिसराला जोडणाºया रेल्वेरुळावरील पादचारी पुलाचे गत आठवड्यात उद्घाटन झाले. त्या ठिकाणी पादचाºयांकडून रूळ ओलांडला जात असल्याने अपघाताच्या घटना घडत होत्या. त्याला आळा घालण्यासाठी पालिकेच्या सुमारे सहा कोटी ८४ लाख रुपये खर्चातून हा पादचारी पूल बांधण्यात आला आहे. यामुळे नागरिकांना एका विभागातून दुसºया विभागात जाण्यासाठी रेल्वेरूळ ओलांडून करावा लागणारा मृत्यूच्या दाढेखालील प्रवास टळला आहे. मात्र, हा पूल पादचाºयांसाठी वरदान ठरत असतानाच त्यावर फेरीवाल्यांनी अतिक्रमण करण्यास सुरुवात केली आहे. जनता मार्केट परिसरात प्रत्येक रविवारी मोठ्या प्रमाणात आठवडे बाजार भरत असतो. त्यापैकी काही फेरीवाल्यांनी या नव्या पुलावरच बाजार भरवल्याचे पुलाच्या उद्घाटनानंतरच्या पहिल्याच रविवारी पाहायला मिळाले. सदर पुलाच्या उद्घाटनावेळीच त्यावर फेरीवाल्यांचे अतिक्रमण होण्याची शक्यता पालिका अधिकाºयांनी वर्तवली होती. या नव्या पुलाला जोडून असलेल्या ठाणे-बेलापूर मार्गावरील पुलावरही फेरीवाल्यांनी यापूर्वी कब्जा मिळवला होता. मात्र, त्यांच्यामुळे पादचाºयांना अडचण होऊ लागल्याने नागरिकांकडूनहोणाºया विरोधामुळे ते त्या ठिकाणी फार काळ टिकू शकले नाहीत. या पूर्वानुभवावरून रेल्वेरुळावरील नवा पादचारी पूलही अनधिकृत फेरीवाल्यांच्या विळख्यात सापडणार नाही याची खबरदारी घेतली जाणे आवश्यक आहे. मात्र, संबंधित सर्वच प्रशासनाकडून त्याकडे कानाडोळा होताना दिसत असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते गोविंद साळुंखे यांनी केला आहे. परिणामी, पादचाºयांना पुलावरून चालण्यात अडथळा निर्माण होत आहे. तर या फेरीवाल्यांवर वेळीच कारवाई न झाल्यास त्यांना अर्थपूर्ण राजाश्रय मिळून भ्रष्टाचाराला खतपाणी मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Web Title: Rail pedestrian bridge constructed by hawkers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.